• Download App
    आरूसा आलमकडून कॅप्टन अमरिंदर सिंगांचे समर्थन; म्हणाल्या, त्यांना हटविण्याची किंमत काँग्रेसला चुकवावी लागेल!!। Support of Capt. Amarinder Singh from Arusha Alam; Said, Congress will have to pay the price for their removal !!

    आरूसा आलमकडून कॅप्टन अमरिंदर सिंगांचे समर्थन; म्हणाल्या, त्यांना हटविण्याची किंमत काँग्रेसला चुकवावी लागेल!!

    विशेष प्रतिनिधी

    चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या समर्थनासाठी पाकिस्तानी पत्रकार आरूसा आलम बाहेर आल्या आहेत. अमरिंदर सिंग यांच्याशी आपले नाते निखळ मैत्रीचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याचवेळी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयशी संबंधांबाबत देखील वेगळा दावा त्यांनी केला आहे. भारतीय गुप्तचर संस्था रॉ ने चौकशी आणि तपास करून त्या आरोपातून मुक्त केल्याचा दावा आरूसा आलम यांनी केला आहे. Support of Capt. Amarinder Singh from Arusha Alam; Said, Congress will have to pay the price for their removal !!

    फ्री प्रेस जर्नलने ही बातमी दिली आहे. आरूसा आलम यांनी दावा केला आहे, की कॅप्टन साहेबांशी त्यांचे अतिशय माणुसकीचे नाते आहे. त्या त्यांची खूप चांगली मैत्रीण आहेत. याचा त्यांना खूप अभिमान आहे. कॅप्टनसाहेबांकडून त्यांना खूप काही शिकायला मिळाले आहे. या नात्यावर टीका करणारे आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे लोक नैतिकतेच्या बाबतीत सिंग यांच्या जवळही जाऊ शकत नाही,” असं म्हणत अरूसा आलम यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली आहे.



    अरूसा यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना “निर्लज्ज” या शब्दात सुनावले आहे. रॉ ने आपल्याला कथित हेरगिरीच्या आणि आयएसआयशी संबंध असल्याच्या सर्व आरोपातून मुक्त केले आहे. पाकिस्तानमधील आपल्या कामांची रॉ ने कसून तपासणी केली आहे. सर्व तपासणीनंतर मला रॉ आणि इतर आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांनी सर्व आरोपातून मुक्त केले आहे, असा दावा अरूसा आलम यांनी केला आहे.

    अमरिंदर सिंग यांना त्यांच्याच सहकाऱ्यांनी ज्या प्रकारे त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवले. त्यामुळे ते दुखावले गेले आहेत. ज्या लोकांनी त्यांना पदावरून हटवले, ते अमरिंदर सिंग यांच्यामुळेच राजकारणात मोठे झालेत. काँग्रेसने माकडाच्या हातात वस्तरा दिला आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल न्याय मिळवण्यासाठी त्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ शकते, असा इशाराही आरूसा आलम यांनी दिला आहे.

    ज्यांनी फोटो आणि माहिती प्रसिद्ध केली अशा सर्व राजकारणी आणि मीडिया हाऊसच्या विरोधात मानहानीच्या याचिका दाखल करण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि मानवाधिकार आयोगामार्फत मी त्यांच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न करणार आहे, असा इशाराही अरूसा आलम यांनी दिला आहे.

    Support of Capt. Amarinder Singh from Arusha Alam; Said, Congress will have to pay the price for their removal !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य