• Download App
    सुंदर पिचई यांचे देशप्रेम, भारताला कोरोना संकटावर मदत करण्यासाठी गुगल करणार ११३ कोटींची मदत|Sundar Pichai's patriotism, Google to donate Rs 113 crore to help India corona crisis

    सुंदर पिचई यांचे देशप्रेम, भारताला कोरोना संकटावर मदत करण्यासाठी गुगल करणार ११३ कोटींची मदत

    गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी आपल्या देशप्रेमाचा पुन्हा एकदा दाखला देत भारताला कोरोनावर उपाययोजेसाठी ११३ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुगल कंपनीची स्वयंसेवी संस्था अशालेल्या गुगल ऑर्ग कडून भारताला हीमदत मिळणार आहे. कोरोनाच्या संकटात ऑक्सिजन अभावी भारतात अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे देशात ८० आॅक्सिजन प्लॅँट उभारण्यासाठी गुगल ऑ र्ग मदत करणार आहे.Sundar Pichai’s patriotism, Google to donate Rs 113 crore to help India corona crisis


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी आपल्या देशप्रेमाचा पुन्हा एकदा दाखला देत भारताला कोरोनावर उपाययोजेसाठी ११३ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुगल कंपनीची स्वयंसेवी संस्था अशालेल्या गुगल ऑर्ग कडून भारताला हीमदत मिळणार आहे.

    कोरोनाच्या संकटात आॅक्सिजनअभावी भारतात अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे देशात ८० ऑ क्सिजन प्लॅँट उभारण्यासाठी गुगल ऑर्ग मदत करणार आहे.देशात सर्वाधिक गरज अशालेल्या ग्रामीण भागात हे प्लॅँट उभारले जाणार आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठीही गुगलकडून मदत केली जाणार आहे.



    त्यासाठी देशातील विविध भागातील स्वयंसेवी संस्थांना गुगल सहकार्य करणार आहे. गिव्हइंडिया या सस्थेला सुमारे ९० कोटी तर पाथ नावाच्या संस्थेला १८.५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर अपोलो मेडीस्किल्स या संस्थेलाही मदत दिली जाणार आहे.

    या माध्यमातून ग्रामीण भागातील सुमारे २० ह जार फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना व्यवस्थापनाचे शिक्षण देऊन त्यांच्यातील कौशल्ये वाढविली जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मनुष्यबळाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

    अरमान या संस्थेला सुमारे ३.६ कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. यातून १ लाख ८० हजार सामाजिक आरोग्य कार्यकर्ते आणि चाळीस हजार एनएनएम परिचारिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
    गुगल इंडियाचे उपाध्यक्ष आणि भारतातील प्रमुख संजय गुप्ता म्हणाले, भारत गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या लाटेचा सामना करत आहे.

    यामध्ये वेगवेगळ्या संस्था, समाज, व्यक्ती सरकारसोबत मिळून काम करत आहे हे अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच कोरोनामुळे होणारे नुकसान कमी झाले आहे. त्यामुळेच गुगल कंपनीने लोकांना जास्तीत जास्त माहिती देऊन या महामारीविरुध्द लढण्याचे शस्त्र दिले आहे.

    त्याच्यापुढे जाऊन आता भारतातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी गुगल मदत करणार आहे. आमच्या सहयोगी संस्थांना जास्तीत जास्त मदत करून या संकटाविरुध्द लढण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण केले जाणार आहे.

    Sundar Pichai’s patriotism, Google to donate Rs 113 crore to help India corona crisis

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची