• Download App
    आंतरराष्ट्रीय पातळीवर असाही मोदीद्वेष, आक्रस्ताळ्या ममता बॅनर्जींना आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेसाठी आमंत्रण|Such anti-Modi hatred at the international level, Invitation to Mamata Banerjee for International Peace Conference

    आंतरराष्ट्रीय पातळीवर असाही मोदीद्वेष, आक्रस्ताळ्या ममता बॅनर्जींना आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेसाठी आमंत्रण

    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रस्ताळ्या स्वभावासाठी प्रसिध्द आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोदीद्वेषामुळे ममता बॅनर्जी यांना चक्क आंतरराष्ट्रीय शांतता वर्ल्ड मीटिंग फॉर पीस पीपल्स ब्रदर्स अ‍ॅजफ्यूचर अर्थ या शीर्षकाचे रोममधील कॅथोलिक असोसिएशन ऑफ सँट एजिडियोच्या कम्युनिटीचे अध्यक्ष मॅक्रो इम्पाग्लियाझो यांनी ममता बॅनर्जी यांना पाठविले आहे. मात्र, यासाठीचा निकष काय याबाबत काहीही म्हटलेले नाही.Such anti-Modi hatred at the international level, Invitation to Mamata Banerjee for International Peace Conference

    या निमंत्रणात म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या मोठ्या विजयाबद्दल आणि सामाजिक न्यायासाठी, देशाच्या विकासासाठी आणि तुम्ही शांततेसाठी करत असलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी हे निमंत्रण पाठविण्यात आले आहे.



    ममता बॅनर्जी यांची दोन मे रोजी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. मात्र, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये प्रचंड हिंसाचार झाला. तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले. भाजप कार्यकर्त्यांच्या पत्नीवर बलात्काराचा प्रकारही उघडकीस आला होता. यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने ममता बॅनर्जी आणि तृणमूल कॉँग्रेसवर ताशेरेही ओढले आहेत. तरीही त्यांना शांतता परिषदेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

    Such anti-Modi hatred at the international level, Invitation to Mamata Banerjee for International Peace Conference

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!