- नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा राजा पंजम जॉर्ज याचा पुतळा असणाऱ्या मेघडंबरीमध्ये बसवला जाणार आहे. 1968 मध्ये पंचम जॉर्ज यांचा पुतळा हटवण्यात आला होता. त्यावेळीपासून ती मेघडंबरी रिकामी होती.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली येथील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. Subhash Chandra Bose: Narendra Modi inaugurates 3D image of Netaji Subhash Chandra Bose at India Gate
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. केंद्र सरकारनं सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस साजर करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. नेताजी बोस यांची जयंती यावर्षीपासून पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाणार आहे.
आज संसदेत सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली येथील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचा फोटो देखील जारी केला होता. जोपर्यंत पुतळा तयार होत नाही तोपर्यंत नेताजी बोस यांची होलोग्राम स्वरुपातील प्रतिमा तिथं असेल. नरेंद्र मोदी आज त्या प्रतिमेचं अनावरण करणार आहेत. होलोग्राफिक हे डिजीटल तंत्र आहे. हे प्रोजेक्टर सारखं काम करतं. यामध्ये कोणतिही गोष्टी थ्रीडी स्वरुपात दाखवता येते. आपण समोर पाहत असलेली गोष्ट खरी असल्याचा भास होतो पण आपण थ्री़डी इमेज पाहत असतो.
Subhash Chandra Bose : Narendra Modi inaugurates 3D image of Netaji Subhash Chandra Bose at India Gate
महत्त्वाच्या बातम्या
- लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा! अजूनही ICU मध्ये; डॉक्टर म्हणाले – लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा!
- मुंबईतील कमला इमारतीतील अग्निकांडाच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन, 15 दिवसांत देणार बीएमसी आयुक्तांना अहवाल
- Republic Day : आजपासून प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू, फ्लायपास्टच्या वेळेत बदल, जाणून घ्या कार्यक्रमाबाबत सर्व काही