वृत्तसंस्था
नवी दिल्ली : श्रीलंका आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. विकास योजना आणि संरक्षण योजनांसाठी चीनकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतल्यामुळे हे देश आर्थिक संकटात सापडले आहेत. Sri Lanka and Pakistan’s economy in crisis
श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या चलनाचे अवमूल्यन सुरू आहे. श्रीलंकेचा एक रुपया म्हणजे भारताचे २७ पैसे आणि पाकिस्तानचा एक रुपया म्हणजे भारताचे ४२ पैसे अशी स्थिती आहे. श्रीलंकेतील महागाईचा दर १६ टक्क्यांवर तर पाकिस्तानचा महागाईचा दर १२ टक्क्यांवर आहे. श्रीलंकेचा परकीय चलनसाठा फेब्रुवारी २०२२ अखेर २.३ अब्ज डॉलर एवढाच उरला तर पाकिस्तानचा परकीय चलनसाठा २२.२८ अब्ज डॉलर एवढा आहे.
परकीय चलनसाठा वेगाने घटत आहे आणि महागाई सातत्याने वाढत आहे. यामुळे श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणे कठीण झाले आहे. दोन्ही देशांना तेल, औषधे, धान्य अशा अनेक अत्यावश्यक गोष्टींची आयात करणे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे.
Sri Lanka and Pakistan’s economy in crisis
महत्त्वाच्या बातम्या
- हाँगकाँगमध्ये कोरोनाचा हाहाकार : मृत्यू वाढल्याने शवपेट्यांचा तुटवडा, मृत्यूदर पंधरापट जास्त
- मास्कच्या आवश्यकतेतून सूट देण्याचाही विचार व्हावा वैद्यकीय तज्ज्ञांची सरकारकडून अपेक्षा
- The Kashmir Files : “द काश्मीर फाईल्स” चार दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार!!
- नवीनचे पार्थिव बेंगळुरूला पोहोचले