• Download App
    सोनू सूदच्या बहिणीला उमेदवारी दिल्याने कॉँग्रेसमध्ये गृहकलह, विद्यमान आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश|Sonu Sood's sister's candidature sparks strife in Congress, Sitting MLA joins BJP

    सोनू सूदच्या बहिणीला उमेदवारी दिल्याने कॉँग्रेसमध्ये गृहकलह, विद्यमान आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

    विशेष प्रतिनिधी

    चंदीगड: चित्रपट अभिनेता सोनू सूद याच्या बहिणीला कॉँग्रेसने उमेदवारी तर दिली पण त्यामुळे पक्षात गृहकलह उफाळून आला आहे. मोगा या मतदारसंघातील कॉँग्रेसच्या विद्यमान आमदाराने पक्षाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला आहे.Sonu Sood’s sister’s candidature sparks strife in Congress, Sitting MLA joins BJP

    कॉँग्रेसने ८६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अभिनेता सोनू सूद याची बहीण मालविका सूद हिलाही तिकीट देण्यात आले आहे. मात्र, त्यामुळे पक्षात असंतोष आहे. मोगा येथील विद्यमान आमदार डॉ. हरज्योत कमल यांनी काँग्रेसकडून डावलण्यात आल्याच्या नाराजीतून त्यांनी पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.



    मालविका सूद हिने नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू आणि मुख्यमंत्री चरणसिंग चन्नी यांनी सोनू सूद याची मोगा येथे जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर तिथेच मालविकाच्या काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते .

    मोगामधून मालविका सूद हिची उमेदवारी जाहीर झाल्यावर काही तासांतच स्थानिक आमदार हरज्योत यांनी काँग्रेसला रामराम ठोकला व भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे पंजाब निवडणूक प्रभारी गजेंद्रसिंह शेखावत यांनी हरज्योत यांचे पक्षात स्वागत केले.

    हरज्योत कमल यांच्या भाजप प्रवेशाने अधिक आनंद झाला आहे. यामुळे मोगा मतदारसंघात भाजपचा जनाधार वाढणार आहे. त्यांच्या नावातच कमल आहे ही अधिक जमेची बाजू आहे, असे यावेळी शेखावत म्हणाले.

    Sonu Sood’s sister’s candidature sparks strife in Congress, Sitting MLA joins BJP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले