वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या काँग्रेसच्या महत्त्वाकांशी राजकीय कार्यक्रमापूर्वी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी एकत्रित परदेश दौरा करणार आहेत. सोनिया गांधी यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी हा युरोप दौरा होत असल्याची माहिती काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी दिली आहे.Sonia, Rahul, Priyanka tour abroad together ahead of ambitious political programs of Congress
काँग्रेसने सप्टेंबर महिन्यात दोन महत्त्वाचे राजकीय कार्यक्रम जाहीर केले आहेत. 4 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत “महंगाई वर हल्लाबोल” हा काँग्रेसचा मेळावा असेल. या मेळाव्याला खासदार राहुल गांधी संबोधित करणार आहेत. तर 7 सप्टेंबर पासून देशभर काँग्रेस “भारत जोडो अभियान” करणार आहे. या अभियानामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच सिविल सोसायटीचे सदस्य देखील सहभागी होणार आहेत. हा देशव्यापी कार्यक्रम असल्याने काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे.
मात्र या दोन्ही महत्त्वाकांक्षी कार्यक्रमानपूर्वी सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी एकत्रित परदेश दौरा करणार आहेत. सोनिया गांधी यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी हा दौरा होत आहे, असे जयराम रमेश यांनी सांगितले असले तरी नॅशनल हेराड केस मध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीनंतर हे दोन्ही नेते प्रथमच परदेश दौऱ्यावर जात आहेत. त्यातही सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा एकत्रित असा प्रथमच परदेश दौरा होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात संशय वाढला होता. परंतु जयराम रमेश यांनी त्या संदर्भात सोनियांच्या वैद्यकीय तपासणीचा खुलासा केला आहे.
Sonia, Rahul, Priyanka tour abroad together ahead of ambitious political programs of Congress
महत्वाच्या बातम्या
- अदानी ग्रुप विकत घेणार एनडीटीव्ही मीडिया ग्रुपचे 29.18 % शेअर्स; आणखी 26 % शेअर्स विकत घेण्याचीही तयारी
- आमच्याकडे सगळ्यांचा कच्चा चिठ्ठा!!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभेत विरोधकांना सूचक इशारा
- झाकीर नाईकवर हल्लाबोल करत राज ठाकरेंकडून नुपूर शर्मांच्या वक्तव्याचे पुन्हा समर्थन!!
- राष्ट्रवादी अल्पसंख्यांक मेळावा : बिल्कीस बानो प्रकरणावरून शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा!!