• Download App
    सहा वर्षांच्या नातवासमोर साठ वर्षीय महिलेवर तृणमूलच्या गुंडांकडून बलात्कार, पश्चिम बंगालमधील मे महिन्यातील भयानक प्रकार आले पुढे|Sixty-year-old woman raped by Trinamool goons in front of six-year-old grandson, horrific incident in May in West Bengal

    सहा वर्षांच्या नातवासमोर साठ वर्षीय महिलेवर तृणमूलच्या गुंडांकडून बलात्कार, पश्चिम बंगालमधील मे महिन्यातील भयानक प्रकार आले पुढे

    पश्चिम बंगालमध्ये २ मे रोजी सत्ता मिळविल्याच्या उन्मादात तृणमूल कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली भयानक कृत्ये आता समोर येऊ लागली आहेत. एका साठ वर्षांच्या महिलेवर तिच्या सहा वर्षांच्या नातवासमोर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.Sixty-year-old woman raped by Trinamool goons in front of six-year-old grandson, horrific incident in May in West Bengal


    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये २ मे रोजी सत्ता मिळविल्याच्या उन्मादात तृणमूल कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली भयानक कृत्ये आता समोर येऊ लागली आहेत. एका साठ वर्षांच्या महिलेवर तिच्या सहा वर्षांच्या नातवासमोर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    यासंदर्भात दोन महिलांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत विशेष तपास पथकाद्वारे तपास करण्याची मागणी केली आहे. सत्ताधारी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. ६० वर्षीय एका पिडीत महिलेच्या म्हणण्यानुसार ६ वर्षाच्या नातवासमोर तिचा बलात्कार केला गेला.



     

    दुसऱ्या अल्पवयीन पिडीतेने अपहरण करत बलात्कार करण्यात आल्याचे म्हटले आहे.बलात्कार करताना हे बलात्कारी म्हणत होते की भाजपाचा प्रचार करणाºयांना शिक्षा देण्यात येईल.ही घटना बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील घडली आहे. या साठ वर्षीय महिलेने म्हटले आहे

    की, ४ मे रोजी रात्री तृणमूलचे कार्यकर्ते जबरदस्ती घरामध्ये शिरले आणि नातवासमोरच आपला बलात्कार केला . तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी घरात लूटमार केली. खेजुरी येथे भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर १०० ते २०० तृणमूलचे कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराला घेराव घातला होता. घराला बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी त्या कार्यकर्त्यांनी दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वृद्ध महिलेच्या सुनेने घर सोडले.

    या घटनेनंतर शेजाऱ्यानी दुसऱ्या दिवशी बेशुद्ध असलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले होते. जावयाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याकडे लक्ष दिले नाही. तृणमूलने बलात्कारासारख्या घटना घडवून आणल्या आहेत. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे बंगालमधील या घटनांना प्रोत्साहन दिले जात आहे असे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात या महिलेने म्हटले आहे.

    यापूर्वी १८ मे रोजी सुप्रीम कोटार्ने सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर पश्चिम बंगाल सरकारला नोटीस बजावली होती. मतदानानंतर झालेल्या हिंसाचारात भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांचा खून केल्याच्या आरोपावरून हा अर्ज दाखल करण्यात आला होता.

    ज्या महिलांनी अर्ज दाखल केला त्यापैकी एका महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या नवºयाने भाजपासाठी प्रचार केला होता. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ओळख पटवत भरदिवसा कुºहाहक्षश्रष त्यांची हत्या केली. मतदानानंतर झालेल्या हिंसाचाराबाबत मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने बंगाल सरकारला नोटीस बजावली होती.

    या व्यतिरिक्त, ४ जून रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने बंगाल सरकारच्या प्रशासनाला मतदानानंतर झालेल्या हिंसाचारानंतर घरे सोडून पळून गेलेल्या लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत

    Sixty-year-old woman raped by Trinamool goons in front of six-year-old grandson, horrific incident in May in West Bengal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!