विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसने भाजपला पराभूत करून मोठा विजय मिळवला असला तरी काँग्रेसच्या दृष्टीने हा मोठा विजय याच “गले की हड्डी” ठरला आहे. काँग्रेसने भाजप पेक्षा दुप्पट 135 जागा मिळवून देखील तिथे शांतपणे सत्ता स्थापन होण्याऐवजी मुख्यमंत्री पदासाठी मोठी स्पर्धा तयार झाली आहे. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात आमदारांच्या आकड्यांची खेचाखेच सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांड पुढे मोठा पेच तयार झाला आहे.Siddaramaiah and shiv Kumar lock horns over MLAs support, Congress highcommand in the dock
काँग्रेस अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांच्याकडे 90 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र आहे, तर शिवकुमार 40 आमदार आपल्या भोवती जमवू शकले आहेत आणि नेमका हाच मोठा पेचप्रसंग आहे. कारण सिद्धरामय्या किंवा शिवकुमार या दोन्ही नेत्यांपैकी कोणालाही दुखावले तरी काँग्रेस बहुमताचा आकडा गमावण्याचा धोका उत्पन्न होतो आणि प्रचंड बहुमत मिळवूनही कर्नाटक गमावण्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे हा राजकीय धोका टाळण्यासाठी काँग्रेस हायकमांड वेगवेगळ्या फॉर्मुल्यांवर चर्चा करत आहे. यात सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात अडीचडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचे वाटप, त्याचबरोबर एकाहून जास्त अधिक उपमुख्यमंत्री, ज्या गटाचा मुख्यमंत्री त्या विरोधी गटाला जास्ती आमदार मंत्रीपदे अशा फॉर्म्युल्यांवर काँग्रेस हायकमांड मंथन करत आहे. पण एकूण 135 जागा निवडून आणूनही काँग्रेस हायकमांड पुढचा पेच संपण्याऐवजी तो अधिकच वाढला आहे.
याखेरीज ज्या मुस्लिम समुदायाने काँग्रेसला एकगठ्ठा मतदान केले. त्या मुस्लिम समुदायाचे 9 आमदार निवडून आले आहेत. त्यापैकी 5 जणांना मंत्री करावे आणि एकाला उपमुख्यमंत्री पद द्यावे, अशी मागणी सुन्नी वक्फ बोर्डाने आधीच केली आहे. काँग्रेस हायकमांड त्यामुळे दुहेरी पेचात अडकले आहे. एकीकडे सिद्धरामय्याविरुद्ध शिवकुमार यांच्यातला मुख्यमंत्री पदाचा पेच आणि दुसरीकडे आपल्यालाच एकगठ्ठा मतदान करणाऱ्या मुस्लिम समुदायाला उपमुख्यमंत्री पद आणि 5 मंत्रिपदे असे हे दोन पेच आहेत. या दोन्ही पेचांमध्ये काँग्रेस हायकमांडने कोणा एका गटाची बाजू घेतली तरी दुसरा गट दुखावला जाऊन काँग्रेस अडचणीत सापडण्याची दाट शक्यता आहे आणि इथेच कर्नाटकात राजस्थानचे रिपीटेशन होण्याचा धोका आहे.
डी. के. शिवकुमार अथवा सिद्धरामय्या यांच्यापैकी कोणीतरी एक “सचिन पायलट” बनण्याचाही धोका आहे आणि हाच धोका पुढे जाऊन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका देण्याची शक्यता आहे. ही भीती काँग्रेसला वाटते आहे. त्यामुळे या पेचातून काँग्रेस हायकमांड कसा मार्ग काढणार?? शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांना दिल्लीत पाचारण करून त्यांच्यात कशी दिलजमाही करणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Siddaramaiah and shiv Kumar lock horns over MLAs support, Congress highcommand in the dock
महत्वाच्या बातम्या
- सरकार विरोधात पोलीस – प्रशासनाला चिथावणी देणे संजय राऊतांना भोवले; राऊतांविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल
- परीक्षेची संधी : एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा; डाॅ. भारती पवारांची ग्वाही
- Jammu-Kashmir : टेररफंडिंग प्रकरणी ‘NIA’ची पुलवामासह सहा ठिकाणी छापेमारी!
- मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही