• Download App
    शीख, हिंदूंमध्ये हिंसाचार घडवण्याचा कट, पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द करून योजना उधळल्याने श्री अकाल तख्ताने मानले आभारShri Akal Takht thanked the Prime Minister for repealing the Agriculture Act and disrupting the scheme, Conspiracy to cause violence among Sikhs and Hindus

    शीख, हिंदूंमध्ये हिंसाचार घडवण्याचा कट, पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द करून योजना उधळल्याने श्री अकाल तख्ताने मानले आभार

    विशेष प्रतिनिधी

    चंदीगड : तीन कृषी कायद्यांच्या विरोधासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या आड शीख आणि भारत सरकारमधील संघर्ष पेटवण्याचा तसेच शीख व हिंदूंमध्ये हिंसाचार घडवण्याचा कट रचण्यात आला होता.Shri Akal Takht thanked the Prime Minister for repealing the Agriculture Act and Conspiracy the scheme, Conspiracy to cause violence among Sikhs and Hindus

    मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेऊन हा कट उधळला याबाबत श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीतसिंग यांनी आभार मानले आहेत.
    ज्ञानी हरप्रीतसिंग यांनी चत्रफीत जारी केली आहे.



    त्यामध्ये म्हटले आहे की, वेळीच कृती करीत मोठा हिंसाचार टाळल्याबद्दल भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे त्यांनी आभार मानले आहेत. व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने एक मोठे राष्ट्रीय संकट टाळले आहे.

    या आंदोलनातील काही गट शिखांचा विचार, त्यांचे निशाण, उद्देश, इतिहास आणि भावनांकडे दुर्लक्ष करीत होते. यामुळे भविष्यात होणारे नुकसान या माध्यमातून टाळण्यात आले आहे.
    पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.

    प्रकाश पर्वाच्या पृष्ठभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याबाबत केलेली घोषणा, शेतकऱ्यांची मागितलेली माफी यापेक्षा काहीही मोठे असू शकत नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या कल्याणासाठी कृषी कायदे आणले होते, असे अमरिंदरसिंग यांनी सांगितले.

    Shri Akal Takht thanked the Prime Minister for repealing the Agriculture Act and disrupting the scheme, Conspiracy to cause violence among Sikhs and Hindus

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही