• Download App
    दुखद : कोरोना सोबतच्या लढाईत 'शुटर दादीचा' निशाना चुकला...नेमबाज चंद्रो तोमर यांचे निधन ! ‘Shooter Dadi’ Chandro Tomar passes away due to Covid-19

    दुखद : कोरोना सोबतच्या लढाईत ‘शुटर दादीचा’ निशाना चुकला…नेमबाज चंद्रो तोमर यांचे निधन !

    • उत्तर प्रदेशाच्या बागपत येथे राहणाऱ्या या दादी जगातील सर्वात वयोवृद्ध निशानेबाज मानल्या जात .त्यांचे वय ८९ वर्षाचे होते .

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: इंडियाज गॉट टॅलेंट मधून प्रकाश झोतात आलेल्या शुटर दादी…सांड की आंख या चित्रपटानंतर जास्त चर्चेत आल्या . जगभरातील अनेक देशांप्रमाणेच सध्या भारतही कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. सध्या भारतातील परिस्थिती बिकट होत आहे. रोज लाखो लोक कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. रोहित सरदानाच्या दुखद बातमी नंतर आणखी एक दुखद घटना समोर आली आहे . ‘शुटर दादी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या नेमबाज चंद्रो तोमर यांचे आज (३० एप्रिल) निधन झाले आहे. ‘Shooter Dadi’ Chandro Tomar passes away due to Covid-19

    चंद्रो तोमर यांचे शुक्रवारी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले. शुटर दादी म्हणून ओळखल्या जाणार्‍या 89 वर्षीय चंद्रो तोमर यांचा जन्म मुझफ्फरनगरमध्ये झाला होता. मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी दादी चंद्रो तोमर यांचे निधन झाले.

    अखेर ३ दिवस हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्ध लढा दिल्यानंतर त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे. त्या ८९ वर्षांच्या होत्या.

    काही दिवसांपुर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. याबद्दल त्यांच्या ट्विटर हँडेलवर माहिती दिली गेली होती. ‘दादी चंद्रो तोमर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे,’ ट्विट करण्यात आले होते.

      त्यांच्या ट्विटर पेज वरून त्यांना करोना संक्रमण झाल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली होती.

    दादी चंद्रो याना करोनाची लागण झाली असून श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले गेले आहे. ईश्वर सर्वांचे रक्षण करो. शुटर दादीच्या चाहत्यांनी त्यांना लवकर बऱ्या व्हा असे संदेश मोठ्या संखेने पाठविले होते.

    शुटर दादीची कहाणी मोठी रोचक आणि प्रेरणादायी आहे. त्यांची नात शेफाली सुद्धा शुटर आहे. जोहाडी येथे शुटींग रेंज सुरु झाल्यावर शेफालीला पोहोचवायला त्या रेंज मध्ये जात असत आणि निशानेबाजी कशी करतात ते पाहत असत. एकादा त्यांनी सहज पिस्तोलने नेम साधला आणि पहिलाच शॉट १० वर लागला. त्यावेळी शुटर दादीने वयाची साठी ओलांडली होती. घराचा विरोध पत्करून त्यांनी गुपचूप हे कौशल्य प्राप्त केले आणि विविध राष्ट्रीय स्पर्धात ५० हून अधिक पदके मिळविली आहेत. त्यांच्या जीवनावर एक चित्रपट सुद्धा निर्माण झाला आहे.

    त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षांनंतर अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या . त्यांनी त्यांची बहिण प्रकाशी तोमर यांच्यासह अनेस स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. या दोन्ही तोमर भगिनींना जगातील सर्वात जेष्ठ नेमबाजांपैकी एक मानले जाते. तसेच त्यांच्या जीवनावर काहीवर्षांपूर्वी ‘सांड की आँख’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.

    तोमर भगीनींनी अनेक अडथळे पार करत तसेच आजूबाजूच्या लोकांचा विरोध पत्करत त्यांच्या कारकिर्दीत मोठे यश मिळवले. आत्तापर्यंत चंद्रो तोमर यांनी अनेक पदके आणि पुरस्कार देखील मिळवले .

    ‘Shooter Dadi’ Chandro Tomar passes away due to Covid-19

    Related posts

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- अवमान याचिकेसाठी आमची आवश्यकता नाही; अॅटर्नी जनरलची परवानगी घ्या

    Lucknow High Court : लखनऊ हायकोर्टाने केंद्राला म्हटले- राहुल ब्रिटिश आहेत की नाही, 10 दिवसांत रिपोर्ट द्या!