• Download App
    भयंकर! एकट्या एप्रिल महिन्यात देशात कोरोनामुळे तब्बल 45 हजार मृत्यू । In April alone near about 45,000 deaths due to corona in India

    भयंकर : एकट्या एप्रिल महिन्यात देशात कोरोनामुळे तब्बल ४५ हजार मृत्यू

    deaths due to corona in India : भारतात सध्या कोरोना महामारीने हाहाकार उडालेला आहे. कोरोनामुळे जगात सध्या सर्वात जास्त भारतात वाईट परिस्थिती आहे. या वर्षाच्यासुरुवातीला असे वाटत होते की, भारताने कोरोनावर मात केली आहे. परंतु, मार्चदरम्यान सुरू झालेल्या कोरोनाच्या लाटेमुळे आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. एकट्या एप्रिल महिन्यात भारतात कोरोनामुळे तब्बल 45 हजार जणांचे प्राण गेले आहेत. In April alone near about 45,000 deaths due to corona in India


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोना महामारीने हाहाकार उडालेला आहे. कोरोनामुळे जगात सध्या सर्वात जास्त भारतात वाईट परिस्थिती आहे. या वर्षाच्यासुरुवातीला असे वाटत होते की, भारताने कोरोनावर मात केली आहे. परंतु, मार्चदरम्यान सुरू झालेल्या कोरोनाच्या लाटेमुळे आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. एकट्या एप्रिल महिन्यात भारतात कोरोनामुळे तब्बल 45 हजार जणांचे प्राण गेले आहेत.

    एप्रिल महिन्यात भारतात कोरोनाची लाट नव्हे तर त्सुनामीच आली. या महामारीने असा विध्वंस केला की, देशातील प्रत्येक राज्यात समस्यांचा डोंगर उभा राहिला. रुग्णालयांत बेड्सचा तुटवडा जाणवला. अनेक ठिकाणी रुग्णवाहिकांमध्येच रुग्णांनी दम तोडला. तर अनेक जण ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडले.

    फक्त एप्रिलमधील आकडेवारी पाहिली, तर भारतात तब्बल 45 हजार जणांचा जीव गेला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 25 लाखांपर्यंत वाढली आहे.

    एप्रिलच्या सुरुवातीला देशातील कोरोनाची स्थिती
    एकूण रुग्णसंख्या : 1,23,02,115
    एकूण मृत्यू : 1,63,428
    सक्रिय रुग्णसंख्या : 6,10,929

    30 एप्रिल रोजी कोरोनाची स्थिती
    एकूण रुग्णसंख्या : 1,87,54,984
    एकूण मृत्यू : 2,08,313
    सक्रिय रुग्णसंख्या : 31,64,825

    एप्रिल महिन्यात कोरोनाने भारतात कशा प्रकारे विध्वंस घडवला, हे या आकडेवारीवरून सहज लक्षात येईल. सक्रिय रुग्णसंख्या सार्वकालिक उच्चांकावर गेल्याने देशात अनेक ठिकाणी बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. उपचारांसाठी येणाऱ्यांना बेड्स आणि ऑक्सिजनचा अभाव जाणवतोय.

    याचबरोबर देशात अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनही सुरू झाले आहे. अनेक राज्यांनी आपल्या मर्यादित वैद्यकीय सुविधांमुळे लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेशशिवाय अनेक राज्यांनी आपल्या येथे, वीकेंड लॉकडाऊन, 15 दिवसांचा लॉकडाऊन, नाइट कर्फ्यू, कंटन्मेंट झोन यासारख्या अनेक उपाययोजना केल्या आहेत.

    In April alone near about 45,000 deaths due to corona in India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’