• Download App
    भाजपवर तोफा डागत तृणमूळची काँग्रेस फोडाफोडी, शिवसेनेची गोव्यावर स्वारी । shiv sena will contest 22 seats in goa, says sanjay raut

    भाजपवर तोफा डागत तृणमूळची काँग्रेस फोडाफोडी, शिवसेनेची गोव्यावर स्वारी

    विशेष प्रतिनिधी

    पणजी : भाजपवर तोफा डागत तृणमूळची काँग्रेस फोडाफोडी आणि शिवसेनेची गोव्यावर स्वारी हे आजच्या गोव्याच्या राजकारणाचे चित्र आहे. तृणमूळ काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी गोवा काँग्रेस फोडून माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांना तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आहे. त्यांच्या समवेत अनेक नेते आमदारही फुटले आहेत. shiv sena will contest 22 seats in goa, says sanjay raut

    तर दुसरीकडे शिवसेनेने गोव्यावर स्वारी करायचा मनसूबा रचला आहे. शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत गोव्यात येत आहेत. आम्ही महाराष्ट्रात कोणताही पक्ष फोडला नाही. आज भाजप कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ते कोणावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.



    महाराष्ट्र आणि गोव्याची तुलना करता येणार नाही. भाजपाने गोव्यात अनेकदा तोडफोड करत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची इच्छा जनतेची आहे आणि ते शिवसेनाच करू शकते. आमचं गोव्यात प्राबल्य आहे. कोणासोबत युती किंवा आघाडी झाली तर ठीक, नाहीतर आमचे आम्ही लढू, असे संजय राऊत म्हणाले.

    मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, की उद्धवजींच्या सांगण्याप्रमाणे मी आता गोव्याला निघालो आहे. आम्ही तिकडे २२ जागांवर लढू. आज संपूर्ण गोव्याला अंमली पदार्थांचा विळखा पडलेला आहे. गोव्यात कॅसिनोचा, जुगाराचा कहर आहे. त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करतच भाजपा तिकडे सत्तेवर आली. मात्र आज त्या सगळ्याला भाजपाचाच पाठिंबा आहे. कोरोनाकाळात गोव्याची अवस्था वाईट झाली आहे. ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा अडकला आहे. भाजपा फारच थापा मारत आहे. त्यासाठी तिकडे जाणे गरजेचे आहे. बाळासाहेब ठाकरेही तिकडे प्रचारासाठी गेले होते. आम्ही जिंकलो जरी नसलो तरी तिकडे आमचे संघटन आहे, याची आठवण राऊत यांनी करून दिली.

    shiv sena will contest 22 seats in goa, says sanjay raut

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!