• Download App
    वज्रमुठीची बोटे ढिल्ली पडल्यानंतर 82 वर्षाचा तरुण वज्रमुठ सभेला संबोधित करण्याची चर्चा!!Sharad Pawar to address vajramooth sabha in Mumbai on 1st may 2023

    वज्रमुठीची बोटे ढिल्ली पडल्यानंतर 82 वर्षाचा तरुण वज्रमुठ सभेला संबोधित करण्याची चर्चा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडीची संभाजीनगरची पहिली वज्रमूठ सभा झाल्यानंतर महाविकास आघाडीत चार मुद्द्यांवर असे मतभेद उत्पन्न झाले की वज्रमूठीची सर्व बोटे ढिल्ली होऊन गेली. त्यानंतर नागपुरात 16 एप्रिल रोजी वज्रमूठ सभा होणार आहे. पण या वज्रमूठ सभेपेक्षा मुंबईत एक मे रोजी होणाऱ्या वज्रमूठ सभेत 82 वर्षाचा तरुण महाविकास आघाडीचा किल्ला लढवणार आहे, अशा बातम्या मराठी माध्यमांनी देऊन त्याची चर्चा घडवायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी सिल्वर ओकच्या बैठकीत शरद पवारांना वज्रमूठ सभेला उपस्थित राहण्याची विनंती केल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. Sharad Pawar to address vajramooth sabha in Mumbai on 1st may 2023

    संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कराल तर सहन करणार नाही, असा दम भरला त्यानंतर महाविकास आघाडीच्या वज्रमूठीची एक एक बोटे ढिल्ली पडायला सुरुवात झाली. शरद पवारांनी सावरकर मुद्द्यावर मध्यस्थी करत काँग्रेसला बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर पवारांनी अदानी मुद्द्यावर काँग्रेसपेक्षा पूर्ण वेगळी भूमिका घेत काँग्रेस हायकमांडला डिवचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीच्या मुद्द्यावर ठाकरे गट आणि काँग्रेस एक सूरात बोलत असताना अजितदादा पवार आणि स्वतः शरद पवार यांनी वेगळा सूर लावला.



    दरम्यानच्या काळात दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या मुद्द्यावर बैठक झाली आणि तिथे त्या मशीनविरुद्ध इलेक्शन निवडणूक आयोगाकडे तक्रार करायचे ठरले पण मुंबईत मात्र अजितदादांनी ईव्हीएमचे समर्थन करून विरोधकांनी एकत्र येऊन मांडलेल्या मुद्द्याला छेद दिला. सावरकर, अदानी, ईव्हीएम आणि पंतप्रधानांची पदवी या चार मुद्द्यांवर महाविकास आघाडीतले घटक पक्ष वज्रमूठ आवळून भाजपला एकत्रित पंच मारण्याऐवजी त्या वज्रमूठीची बोटेच ढिल्ली पडल्याचे जनतेला दिसले!!

    त्यानंतर आता नागपूरला 16 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा होणार आहे. तिथे देखील बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अजितदादा पवार, उद्धव ठाकरे यांचीच प्रमुख भाषणे होणार आहेत. कारण त्या सभेला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. मात्र 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी मुंबईत होणाऱ्या वज्रमूठ सभेला शरद पवार पुन्हा उपस्थित राहणार आहेत. त्याच सभेच्या बातम्या 82 वर्षाचा तरुण महाविकास आघाडीचा किल्ला लढवणार असल्याच्या भाषेत मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.

    दरम्यानच्या काळात काल उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्याशी काही विशिष्ट मुद्द्यांवर चर्चा केलीह त्यावेळी खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. आता पुढच्या आठवड्यात काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल मुंबईत येणार आहेत आणि ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी महाविकास आघाडीतशी संबंधित विषयांवर चर्चा करणार आहेत, अशी बातमी सूत्रांच्या हवाल्याने मराठी माध्यमांनी दिली आहे.

    त्यामुळे एकंदर आघाडीच्या वज्रमुठीची बोटे ढिल्ली पडल्यानंतर 82 वर्षाचा तरुण महाविकास आघाडीची वज्रमूठ सांभाळायला पुढे आल्याची मखलाशी मराठी माध्यमांनी चालवली आहे.

    Sharad Pawar to address vajramooth sabha in Mumbai on 1st may 2023

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य