राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
विशेष प्रतिनिधी
नागालँड मध्ये भाजप आणि एनडीपीपी ही स्थानिक आघाडी पूर्ण बहुमताने सत्तेवर आली आहे. 60 पैकी 37 जागा या आघाडीने जिंकल्या आहेत. तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांनी त्या सरकारला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाही सुरू आहेत. तर हा निर्णय घेण्यामागचं कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: सांगितलं आहे. Sharad Pawar explained the reason behind his decision to go with the ruling BJP in Nagaland
“नागालँडमध्ये निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सात विधानसभा सदस्य निवडून आले. निवडणुकीच्या काळात तेथील मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा होता. आमचा पाठिंबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आहे, त्यामुळे भाजपाबरोबर आम्ही युती केली नाही. आमची अंडरस्टँडिंग त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांसोबत आहे.” असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं आहे. एवढंच नाहीतर “नागालँडमधील चित्र बघितल्यानंतर तेथे एकप्रकारे राजकीय स्थैर्य येण्यासाठी आमची मदत मुख्यमंत्र्यांना होत असेत, तर आमचा पाठिंबा आहे. मात्र, भाजपाला आमचा पाठिंबा नाही.’’ असंही शरद पवार म्हणाले.
याशिवाय, ‘’मला आश्चर्य वाटतं मेघालय आणि शेजारील राज्यात निवडणुका पार पडल्या. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा दोघेही गेले होते. पंतप्रधानांनी मेघालयाच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांचा पराभव करण्याचं आवाहन केलं होतं आणि निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर त्यांच्यासोबत सहभागी झाले व आपल्या सहकाऱ्यांना मंत्रीमंडळात सहभागी केलं. ती भूमिका आम्ही नाही घेतली.” असं शरद पवारांनी सांगितलं आहे.
Sharad Pawar explained the reason behind his decision to go with the ruling BJP in Nagaland
महत्वाच्या बातम्या
- प्रियंका गांधींच्या पीएविरुद्ध एफआयआर, अर्चना गौतम यांनी केले गंभीर आरोप – जाणून घ्या संपूर्ण वाद
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बंगळुरू, राजस्थानमध्ये महिलांना मोफत बस प्रवास
- नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांना सर्वोच्च न्यायालयात हजर करणार, 5 हजार लोकांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली
- Afghanistan Issue : भारत चाबहार बंदरमार्गे २० हजार मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पाठवणार