प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ असे राजकीय घमासान सुरू असताना अजितदादा कॅम्प मधून अनेक नेत्यांनी शरद पवारांवर थेट निशाणा न साधता खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवारांना टार्गेट केल्यानंतर शरदनिष्ठ गटाने देखील आपली स्ट्रॅटेजी बदलली आहे. या स्ट्रॅटेजी नुसार आता अजितदादा सोडून इतर नेत्यांवर रोहित पवारांनी निशाणा साधला आहे.Sharad pawar camp changed strategy, targets other leaders barring ajit pawar
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपने फोडला आणि त्यांना राष्ट्रवादीतल्या चार-पाच नेत्यांची साथ दिली. पण ते सगळे अजितदादांना “व्हिलन” ठरवत आहेत आणि भाजपचे नेते एसीत बसून आपली मजा बघत आहेत, अशा शब्दांत रोहित पवारांनी राष्ट्रवादीतल्या प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील आदी नेत्यांवर निशाणा साधला.
शरदनिष्ठ विरुद्ध अजित निष्ठा यांच्यातला वादाचा हा नवा एपिसोड आहे. प्रफुल्ल पटेल यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला नकार दिला. शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व सगळ्या वरिष्ठ नेत्यांवर लादले म्हणून वरिष्ठ नेते त्यांच्यापासून बाजूला झाले, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी नाशिक मधल्या पत्रकार परिषदेत केले, तर आंबेगाव मधल्या मेळाव्यात दिलीप वळसे पाटलांनी रोहित पवारांवर निशाणा साधला होता. रोहित पवारांचे जेवढे वय आहे त्यापेक्षा माझी सार्वजनिक जीवन जास्त मोठे आहे. त्यांनी जपून बोलावे, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
रोहित पवारांनी त्यांच्यावर पलटवार करताना 40 वर्षे शरद पवारांच्या जवळ राहून शरद पवार कळले नाहीत, अशा शब्दांत दिलीप वळसे पाटलांवर आणि इतर नेत्यांवर निशाणा साधला. पण हा निशाणा साधताना रोहित पवारांनी चतुराईने अजितदादांना वगळले. उलट राष्ट्रवादी फोडण्यामागे भाजपला इतर चार-पाच नेत्यांनी साथ दिली आणि आता तेच अजितदादांना “व्हिलन” ठरवत आहेत. भाजपचे नेते एसीत बसून आपली मजा बघत आहेत आणि आपण भाजपवर निशाणा साधण्याऐवजी एकमेकांवर आरोप करून एकमेकांना उत्तरे – प्रत्युत्तरे देत बसलो आहोत, अशा शब्दांत रोहित पवारांनी भाजप आणि राष्ट्रवादीतल्या अजितदादा सोडून इतर नेत्यांवर निशाणा साधला.
पण यामुळेच शरदनिष्ठ गटाची अजितदादांना सांभाळून घेण्याची किंबहुना अजितदादांविषयी जाहीररीत्या सहानुभूती दाखवण्याची स्ट्रॅटेजी उघड्यावर आली.
Sharad pawar camp changed strategy, targets other leaders barring ajit pawar
महत्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळेंची बारामती सीट धोक्यात, त्या कदाचित पवारांच्या राज्यसभेच्या सीटवर शिफ्ट होतील; पृथ्वीराज चव्हाणांचे भाकित
- पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांना दक्षता विभागाने केली अटक
- ‘’… किंवा शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवारही होऊ शकले असते’’ रामदास आठवलेंचं विधान!
- पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या आमदारांची कोंडी; अतुल बेनके “तटस्थ”, तर दिलीप वळसे बॅकफूट वर!!