• Download App
    तेलंगाणातून ३१ डिसेंबरसाठी नागपुरात येणारा सात लाखांचा गांजा जप्त । Seven lakh cannabis from Telangana coming to Nagpur for December 31 seized

    तेलंगाणातून ३१ डिसेंबरसाठी नागपुरात येणारा सात लाखांचा गांजा जप्त

    कारवाईत गांजाशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेली गाडी आणि अन्य साहित्यासह पोलिसांनी १४ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Seven lakh cannabis from Telangana coming to Nagpur for December 31 seized


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बुटीबोरीजवळ ३१ डिसेंबरसाठी येणारा ७४ किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय.या गांजाची किंमत सात लाख आहे.आर्टीका गाडीत गांजी तस्करी सुरू होती. हरियाणा पासिंगच्या गाडीला गांजासह जप्त करण्यात आलंय. प्रकरणी दिल्लीतील करावलनगरचा पवन राजकुमार कश्यप व उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगरचा दीपक धनिराम शर्मा (वय २७) यांना पोलिसानी ताब्यात घेतले.

    तेलंगाणातून चंद्रपूर मार्गानं नागपूर शहरात येत असलेल्या गांजाच्या तस्करी सुरू होती. यासंदर्भात बुटीबोरी पोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत गांजाशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेली गाडी आणि अन्य साहित्यासह पोलिसांनी १४ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



    बुटीबोरी पोलिसांनी चंद्रपूर रोडवर सापळा रचला. पोलिसांनी या मार्गावर नाकाबंदी लावली. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास पोलिसांनी माहिती मिळालेली गाडी थांबवली. पोलिसांनी या गाडीची झडती घेतली असता वाहनाच्या डिक्कीत गांजा सापडला.आरोपींकडून ३६ पॉकिटातील ७४ किलो गांजा जप्त केला. याची किंमत ७ लाख ४७ हजार ८०० रुपये आहे. शिवाय इरटीगा कंपनीची ७ लाख रुपयांची कार, मोबाईल असा एकूण १४ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    Seven lakh cannabis from Telangana coming to Nagpur for December 31 seized

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र