• Download App
    काश्मी र खोऱ्यात दहशतवाद्यांची शोध मोहीम पंधराव्या दिवशीही सुरूच|Search is going in Kashmir valley

    काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची शोध मोहीम पंधराव्या दिवशीही सुरूच

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू  : जम्मू- काश्मीlरच्या पूँच आणि राजौरी जिल्ह्यांत सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधातील तपास मोहीम सलग पंधराव्या दिवशी सुरूच होती. भट्टीदुरियान या जंगल परिसरात नव्याने दहशतवादी आणि सुरक्षा दले यांच्यात चकमक झाल्याची माहिती समोर आलेली नाही. या जंगलांमध्ये काही गुहा असून त्यातच दहशतवादी दबा धरून बसल्याचे बोलले जाते.Search is going in Kashmir valley

    या भागातील संघर्षामध्ये सुरक्षा दलांचे नऊ जवान हुतात्मा झाले असून अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. एक अटकेत असलेला दहशतवादी देखील या चकमकीमध्ये मारल्या गेला आहे. ११ ऑक्टोबर रोजी या भागात सुरक्षादलाची ही मोहीम सुरू झाली होती.



    सुरानकोट आणि मेंढर या भागांबरोबरच थानामंडी या वन परिसरात देखील शोध मोहीम सुरू आहे. सध्या येथील जंगल परिसरावर लष्कराचे हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले असून देखरेखीसाठी ड्रोनचा देखील वापर केला जात आहे. या भागांत दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या बारापेक्षाही अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यात दोन महिलांचा देखील समावेश आहे.

    Search is going in Kashmir valley

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये

    माजी सरन्यायाधीश गवई म्हणाले-आरक्षण म्हणजे मागे राहिलेल्यांना समानता देणे, नवीन लोकांसाठी मार्ग बंद करणे नाही