• Download App
    सत्यपाल मलिक यांनीच काढून घेतली विरोधकांची हवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत चुकीचे बोलले नसल्याचे केले स्पष्ट|Satyapal Malik himself took away the air of opposition, making it clear that he did not speak wrongly about Prime Minister Narendra Modi

    सत्यपाल मलिक यांनीच काढून घेतली विरोधकांची हवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत चुकीचे बोलले नसल्याचे केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या कथित वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या तसेच मोदी- अमित शहा यांच्यात वाद असल्याचे पसरविणाऱ्यांची हवा मलिक यांनीच काढून घेतली आहे. आपण नरेंद्र मोदी यांच्याबाबत काहीही चुकीचे बोललो नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.Satyapal Malik himself took away the air of opposition, making it clear that he did not speak wrongly about Prime Minister Narendra Modi

    गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वृत्तीवर प्रश्न उपस्थित केल्याच्या वक्तव्यावर मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल काही चुकीचे बोलले असे मी म्हटले नाही. अमित शाह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खूप आदर आहे. ते मोदींबद्दल काहीही चुकीचे बोलले नाहीत, असे सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केले आहे.



    सत्यपाल मलिक यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर विरोधकांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काही लोक पंतप्रधान मोदींची दिशाभूल करतात. एक दिवस त्यांना समजेल, असे आपण व्हिडीओमध्ये म्हटल्याचे सत्यपाल मलिक यांनी म्हटले होते. यावरून विरोधकांच्या हातात कोलीत मिळाले होते. पंतप्रधान मोदींवर त्यावरून टीका सुरू केली होती.

    जेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललो तेव्हा त्यांची वृत्ती खूप हट्टी होती. ते म्हणाले की, तुम्ही अमित शाहांना भेटा. अमित शाह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खूप आदर आहे. मी अमित शाह यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले की काही लोकांनी त्यांची दिशाभूल केली आहे आणि एक दिवस त्यांना नक्कीच समजेल, असे सत्यपाल मलिक म्हणाले.

    मलिक यांच्या या वक्तव्यामुळे अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध बिघडले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबतह सत्यपाल मलिक म्हणाले की, दोघांमधील संबंध खूप चांगले आहेत. अमित शाह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खूप आदर आहे.

    मलिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या स्वरात हे कायदे मागे घेतले त्यामुळे त्यांची समाजात सद्भावना वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लोकांचा दृष्टीकोन आता बदलला आहे. लोकांचा भाजपाबद्दलचा दृष्टिकोनही मवाळ झाला आहे. जे काही झाले ते खूप चांगले झाले आहे.

    Satyapal Malik himself took away the air of opposition, making it clear that he did not speak wrongly about Prime Minister Narendra Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार