नाशिक : एकनाथ शिंदे हे कोणाचे मुख्यमंत्री आहेत यावरून शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रमुख संजय राऊत आणि भाजप समर्थकांमध्ये सोशल मीडिया जुगलबंदी जुंपली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, तर आज सकाळपासून या दोन्ही नेत्यांनी भेटीगाठींचा सिलसिला सुरू केला आहे. Sanjay Raut claims eknath shinde as not chief minister of Shivsena, but BJP refuted
सर्वप्रथम शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. त्यानंतर ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटले, तसेच त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची देखील भेट घेतली. या तीनही महानुभवांच्या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विठ्ठल रखुमाईची मूर्ती भेट दिली.
मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीवरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी त्यांना डिवचले आहे. मुख्यमंत्र्यांनी बेळगाव केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठाम निर्णय घेऊनच परत यावे, असा खोचक सल्ला त्यांना दिला आहे. त्याचबरोबर मूळात एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्रीच नाहीत. कारण शिवसेनेचा मुख्यमंत्री दिल्ली पुढे झुकत नाही, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
या मुद्द्यावरून आता संजय राऊत आणि भाजप समर्थकांमध्ये जुगलबंदी रंगली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री दिल्ली पुढे झुकत नाही, या संजय राऊत यांच्या वक्तव्याला भाजप समर्थकांनी सोशल मीडियावर सोनिया गांधी आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे फोटो शेअर करून मग हे कोणाचा मुख्यमंत्री होते?, असा सवाल केला आहे. या फोटोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सोनिया गांधी यांना पुष्पगुच्छ देतानाचा क्षण टिपला गेला आहे. त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर हे देखील सोनिया गांधींना भेटत असल्याचा फोटो भाजप समर्थकांनी शेअर करून ठाकरे गटाला टार्गेट केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात शिवसेनेचे खासदार फुटणार त्याची व्युहरचना दोन्ही नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यात होत आहे, असा दावा मराठी माध्यमांनी केला आहे. याच मुद्द्यावरून मूळात एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत तर ते भाजपचेच मुख्यमंत्री आहेत, असा टोला संजय राऊत यांनी त्यांना मारला होता. मात्र भाजप समर्थकांनी सोनिया – उद्धव भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
Sanjay Raut claims eknath shinde as not chief minister of Shivsena, but BJP refuted
महत्वाच्या बातम्या
- शिवसेना : “भूतकाळ” विसरून “वर्तमान” गमावले, झाले मोकळे आकाश म्हणत “भविष्या”चे दिवास्वप्न पाहिले!!
- शिंजो आबे : “क्वाड”चे संस्थापक सदस्य, कणखर भारत मित्र!!
- शिवसेनेच्या नव्या चिन्हाची तयारी ठेवा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन; तरीही शिंदे गटाची तडजोडीची तयारी!!
- जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर जीवघेणा हल्ला; जाहीर सभेत घातल्या गोळ्या!!; मोदींशी उत्तम केमिस्ट्री!!
- साखर निर्यात : केंद्राचा कारखानदारांना दिलासा, 8 लाख मे. टन निर्यातीला मुदतवाढ