वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने रविवारी रोड शो, पदयात्रा, सायकल आणि वाहन रॅलींवर घातलेली बंदी वाढवली आहे. मात्र, प्रचार करता यावा, यासाठी सभांसाठीचे नियम शिथिल केले आहेत. Road shows, ban on vehicle rallies increased, ban on actual rallies lifted; Election Commission announces new guidelines
देशातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. खुल्या मैदानात होणाऱ्या सभा, बंद इमारतींमधील सभा आणि रॅलींबाबत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
बंद सभागृहात ५० टक्के क्षमतेने आणि खुल्या मैदानात ३० टक्के क्षमतेने सभा घेण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. याशिवाय घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी २० जणांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आलेली आहे. तसेच रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत प्रचारावर बंदी असणार आहे.