• Download App
    घराणेशाही नाही म्हणजे नाहीच, भाजपने तिकिट नाकारल्याने रिटा बहुगुणा- जोशी यांचा मुलगा समाजवादी पक्षात|Rita Bahuguna-Joshi's son joins Samajwadi Party after BJP refuses ticket

    घराणेशाही नाही म्हणजे नाहीच, भाजपने तिकिट नाकारल्याने रिटा बहुगुणा- जोशी यांचा मुलगा समाजवादी पक्षात

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : घराणेशाही नाही म्हणजे नाहीच, असे उत्तर प्रदेशात भाजपने दाखवून दिले आहे. नेत्यांच्या मुलांना उमेदवारी द्यायची नाही असे धोरण आखले आहे. त्यामुळे भाजपाच्या खासदार रिटा बहुगुणा- जोशी यांच्या मुलाने समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.Rita Bahuguna-Joshi’s son joins Samajwadi Party after BJP refuses ticket

    भाजपा खासदार रिटा बहुगुणा जोशी यांचे चिरंजीव मयंक जोशी यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. मयंक जोशी सपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरूच होत्या, या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. अखिलेश यादव यांनी निवडणुकीच्या व्यासपीठावरूनच मयंक जोशी यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केली.



    आझमगडमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना अखिलेश यादव यांनी मयंक जोशी यांचा सपामध्ये प्रवेश झाला असल्याची घोषणा केली. या घोषणेपूवीर्ही दोघांची भेट झाली होती. रीटा बहुगुणा जोशी यांनी आपल्या मुलाला तिकीट मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण त्यांना अपयश आल्याचं सांगण्यात येत आहे.

    गेल्या महिन्यात मयंक जोशी यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. तेव्हा ही भेट केवळ औपचारिक भेट असल्याचं सांगितलं गेलं होतं. मयंक यांना भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांच्या नाराजीच्या बातम्या येत होत्या व ते समाजवादी पार्टीत प्रवेश करू शकतात, असे बोलले जात होते. मात्र, त्यानंतर रिटा बहुगुणा यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते आणि त्यांच्या मुलाने पक्ष सोडल्याची बातमी केवळ अफवा असल्याचे म्हटले होते.

    रिटा बहुगुणा या ज्येष्ठ नेते हेमवतीनंदन बहुगुणा यांच्य्या कन्या आहेत. कॉँग्रेसच्या नेत्या असलेल्या रिटा बहुगुणा यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली होती. त्यांनी ही निवडणूक जिंकलीही होती.

    Rita Bahuguna-Joshi’s son joins Samajwadi Party after BJP refuses ticket

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Salman Khan : सलमान खानला दहशतवादी म्हणणारे पत्र व्हायरल; पाकिस्तानने दहशतवादी म्हणून सूचीबद्ध केल्याचा दावा

    Indian Army : भारतीय सैन्याचा 30 ऑक्टोबरपासून पाक सीमेवर सराव; पाकिस्तानने दोन दिवसांपूर्वी आपले हवाई क्षेत्र बंद केले, उड्डाणांवर बंदी

    Jyoti Malhotra : हिसारची यूट्यूबर ज्योती तुरुंगातून बाहेर येणार नाही; जामीन अर्ज फेटाळला, कोर्टाने म्हटले- तपासावर परिणाम होऊ शकतो