• Download App
    राज्यसभेतील गदारोळ; केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याआधी आत्मपरीक्षण करा; पियुष गोयल यांचा शरद पवारांना टोला |Riots in Rajya Sabha; Introspect before pointing the finger at the central government; Piyush Goyal slammed Sharad Paware%

    राज्यसभेतील गदारोळ; केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याआधी आत्मपरीक्षण करा; पियुष गोयल यांचा शरद पवारांना टोला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राज्यसभेत झालेल्या लांच्छनास्पद गदारोळारावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच राज्यसभेचे नवनियुक्त नेते केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आत्मपरीक्षणाचा खोचक सल्ला दिला आहे.Riots in Rajya Sabha; Introspect before pointing the finger at the central government; Piyush Goyal slammed Sharad Pawar

    विरोधी सदस्य राज्यसभेत टेबलवर चढून गोंधळ घालत होते. महिला खासदारांशी त्यांनी गैरवर्तन केले. आता त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याच्या भीतीने ते सरकारकडे बोट दाखवत आहेत, असा आरोप पियुष गोयल यांनी केला. पण त्याच वेळी सरकारकडे बोट दाखवण्यापूर्वी विरोधी खासदारांमध्ये जेष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावे आणि मग विरोधकांनी सरकारकडे बोटे दाखवावी, असा टोला पियुष गोयल यांनी लगावला.



    केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील राहुल गांधींना असाच टोला लगावला. त्यांना संसदेत चर्चा हवी आहे, पण ती शिस्तबद्ध हवी आहे की टेबलवर चढून हवी आहे? असा खोचक सवाल अनुराग ठाकूर यांनी केला.

    राज्यसभेत विरोधी खासदार टेबलवर चढून जोरजोरात घोषणा देत होते ते त्यांना चालले काय?, असा सवाल त्यांनी शरद पवारांना आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांना केला.केंद्र सरकारला कोणत्याच विषयी चर्चा घडवायची नव्हती. त्यामुळे त्यांनी राज्यसभेच्या गोंधळाचा अनावश्यक issue केला. त्यांना बेरोजगार युवकांच्या डोळ्यातले अश्रू दिसले नाहीत पण सभापतींच्या डोळ्यातले अश्रू दिसले, असा टोला राहुल गांधी यांनी विजय चौकात विरोधी खासदारांच्या धरणे आंदोलनात लगावला.

    परंतु यात सर्वाधिक चर्चा पियुष गोयल यांनी शरद पवारांना लावलेल्या टोल्याची झाली. कारण शरद पवारांनी गेल्या 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत आपण असा गोंधळ पाहिला नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरच पियुष गोयल यांनी पवारांना सरकारकडे बोट दाखवण्याऐवजी आत्मपरीक्षण करा, असा सल्ला पियूष गोयल यांनी दिला.

    Riots in Rajya Sabha; Introspect before pointing the finger at the central government; Piyush Goyal slammed Sharad Pawar

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!