विशेष प्रतिनिधी
पुणे :पुण्यात सोमवारी रिक्षा,टेम्पो, धान्य बाजार ,भाजीपाला बाजार बंद राहणार आहे.लखीमपुर खीरी येथे झालेल्या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे.या बंदमध्ये विविध कष्टकरी संघटनांनी उडी घेतलीRickshaw, Tempo, grain market, vegetable market will be closed in Pune on Monday
अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती संलग्न हमाल पंचायत ,रिक्षा पंचायत ,छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, तोलणार संघटना, पथारी व्यावसायिक पंचायत, टेम्पो पंचायत यांनीही बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील धान्य बाजार, भाजीपाला व फळे बाजार ,प्रवासी सेवा देणाऱ्या रिक्षा, मालवाहतूक करणारे टेम्पो, तसेच विविध जीवनावश्यक वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणारे हातगाडी चालक ,टपरी व पथारी व्यवसाय बंद राहतील.
संघटनांच्या स्वतंत्र बैठकीत हा निर्णय घेण्यात आला,अशी माहिती समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी दिली .या बंद मध्ये पुणे शहर जिल्हा वाहतूक सेवा संघटनेचे रिक्षाचालक तसेच आम आदमी रिक्षा संघटनाही सहभागी होणार आहेत.
Rickshaw, Tempo, grain market, vegetable market will be closed in Pune on Monday
महत्त्वाच्या बातम्या
- क्रूज ड्रग्स रेव्ह पार्टीतून पकडलेल्या रिषभ सचदेव, प्रतीक गाबा, अमीर फर्निचरवाला यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने का सोडले?; नवाब मलिक यांचा खोचक सवाल
- किंग खानला मोठा दणका : BYJU’S ने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती रोखल्या, प्री-बुकिंग असूनही जाहिराती रिलीज केल्या नाहीत
- चिपी विमानतळ उद्घाटन : शेजारी खुर्च्या तरीही ना नमस्कार, ना नजरेला नजर, ठाकरे-राणेंमधील बेबनाव कार्यक्रमातही तसाच
- काँग्रेसचे नेते लखीमपूरच्या मुद्द्यात “अडकले”; अखिलेश यादव मात्र विजय यात्रेवर निघाले