काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चैतन्यमयी दृष्टीकोन दाखविला आहे, अशा शब्दांत १२ निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यानी पंतप्रधानांचे कौतुक केले आहे. काश्मीरच्या प्रश्नात कोणत्याही बाह्य शक्तीची ढवळाढवळ खपवून घेऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.Retired police officers praise Prime Minister Narendra Modi for resolving Kashmir issue
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चैतन्यमयी दृष्टीकोन दाखविला आहे, अशा शब्दांत १२ निवृत्त आयपीएस अधिकाºयांनी पंतप्रधानांचे कौतुक केले आहे. काश्मीरच्या प्रश्नात कोणत्याही बाह्य शक्तीची ढवळाढवळ खपवून घेऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर दुसºयाच दिवशी १२ निवृत्त आयपीएस अधिकाºयांनी पंतप्रधानांना कौतुकपर पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, पंतप्रधानांनी चैतन्यमयी दृष्टीकोनाने धोरण आखले आहे.
काश्मीरच्या दुखऱ्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधानांचे प्रयत्न स्पृहणिय आहे. केंद्र सरकारने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन चांगले पाऊल उचलले आहे. दिल की दूरी आणि दिल्ली की दूरी याविषयी बोलून काश्मीरी जनतेमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे.
या अधिकाऱ्यामध्ये जम्मू आणि काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस. पी. वैद, के. राजेंद्र कुमार, उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक विक्रम सिंग, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी संचालक प्रकाश मिश्रा यांच्यासह के. सिंग, ब्रदीप्रसाद सिंग, गीता जोहरी, के. अरविंद राव, के. बी. सिंग, नागेश्वर राव, पी. पी. पांडेय, आरकेएस राठोर, शिवानंद झा, एस. के. रौट आणि विवेक दुबे यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने उचललेले पाऊल जम्मू आणि काश्मीरसाठी मोठी उपलब्धी असल्याचे या अधिकाºयांनी म्हटले आहे. त्यामुळे तुमचे सरकार आमच्यासाठी काय करते असे म्हणणाऱ्याना उत्तर मिळणार आहे.
Retired police officers praise Prime Minister Narendra Modi for resolving Kashmir issue
महत्त्वाच्या बातम्या
- गोल्ड जिंकल्यास ३, तर सिल्व्हर मेडल जिंकल्यावर २ कोटींचे बक्षीस, ऑलिम्पिक खेळाडूंसाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- पश्चिम बंगालमध्ये लवकरच लॉन्च होणार Student Credit Card, शिक्षणासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत लोन
- Ravishankar Vs Twitter : एआर रहमानच्या या गाण्यामुळे झाले होते केंद्रीय मंत्र्यांचे अकाउंट लॉक, ट्विटरचे स्पष्टीकरण