वृत्तसंस्था
श्रीनागर : जम्मू-कश्मीरमधील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गुलमर्ग येथील भगवान शंकराच्या १०६ वर्षांच्या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार भारतीय सैन्याने केला आहे. हे मंदिर १९१५ मध्ये बांधले होते. Restoration of the ancient Shiva temple in Kashmir by the Indian Army
मंदिराचा परिसर सुंदर आहे. त्यामुळे राजेश खन्ना आणि मुमताज यांची भूमिका असलेल्या ‘आप की कसम’ चित्रपटाचे शूटिंग येथे झाले होते. ‘जय जय शिव शंकर कांटा लगे ना कंकर’ या प्रसिद्ध गीताचे चित्रीकरण येथेच झाले होते.
जम्मू-कश्मीरचे महाराजा हरीसिंह यांच्या पत्नी महाराणी मोहीनीबाई सिसोदिया यांनी मंदिर उभारले होते. अनेक वर्षांपासून मंदिर जिर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत होते. अखेर भारतीय सैन्याने त्याचा कायापालट केला आहे. जवानांनी त्यासाठी योगदान दिले.
स्थानिकांच्या मदतीने जिर्णोद्धार झाला आहे. त्यासाठी जवान गेले तीन महिने कार्यरत होते. कोरोना काळातील वाया जाणारा वेळ त्यांनी या कामासाठी दिला आहे.
भगवान शिवशंकराचे हे मंदिर बहुविध संस्कृती आणि गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहे, असे रहिवासी गुलाम मोहम्मद शेख यांनी सांगितले.स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण केले आहे. सगळ्यांच्या मदतीमुळे हे काम शक्य झाल आहे.
बीएस फोगट , ब्रिगेडीअर
Restoration of the ancient Shiva temple in Kashmir by the Indian Army
महत्त्वाच्या बातम्या
- जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर अफाट कामगिरी, अंध गिर्यारोहक झांग यांनी सर केले एव्हरेस्ट
- सुमार खटल्यांमुळेच राष्ट्रहिताचे विषय मागे पडत चालल्याची सर्वोच्च न्यायालयाची खंत
- कोरोनाविरोधातील लढाईमध्ये डॉक्टरांच्या हाती आता आणखी एक प्रभावशाली शस्त्र
- ग्राहकांना घरबसल्या दारु पोहोचवण्यासाठी विविध राज्ये सरसावली, काही राज्यांनी बनविली सरकारी ॲप