विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजपथावर वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अनेकांची मने जिंकली. महाराष्ट्राच्या जैवविविधतेचे दर्शन या
चित्ररथाने घडविले आहे. साताऱ्याचे कास पठार, राज्यप्राणी शेकरू आणि पक्षी हरियाल याची माहिती देशातील जनतेला या निमित्ताने झाली. Republic day parade 2022 maharashtra tableau showcases biodiversity of the state
भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला आहे. ४राजपथावरील चित्ररथ हे एक आकर्षण असते. त्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाची चर्चा नेहमीच होते. यंदा जैवविविविधतेचे दर्शन राज्याने घडविले. महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचं लक्ष वेधून घेतले. सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला.
पश्चिम घाटावरील जैवविविधता समृद्ध क्षेत्र म्हणून २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को)ने जागतिक नैसर्गिक वारसास्थळ घोषित केले होते. माळढोक पक्षीआणि खेकड्याच्या नवीन शोधलेल्या प्रजातींची प्रतिकृती देखील रथावर ठेवण्यात आल्या होत्या.याशिवाय वाघ, फ्लेमिंगो, मासे, गिधाड आणि घुबडाची प्रतिकृती तसेच राज्यपक्षी ‘हरियाल’ आणि प्राणी शेकरूचा समावेश होता.
चित्ररथाच्या पुढच्या भागात राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’च्या आठ फूट उंचीच्या देखण्या प्रतिकृतीने शोभा वाढवली. प्रतिकृती घेऊन जाणार्या स्टेजला जारुल आणि ताम्हण या राज्य फुलांनी सुशोभित केले आहे.
Republic day parade 2022 maharashtra tableau showcases biodiversity of the state
महत्त्वाच्या बातम्या
- जाट समाजाला जोडण्यासाठी अमित शहा यांनी घेतली सामाजिक बंधुता बैठक, २५० हून अधिक जाट नेत्यांची उपस्थिती
- अमेरिकेचा पुन्हा एकदा भारतविरोधी प्रचार, भारतात बलात्काराच्या घटना वाढल्याने प्रवास टाळण्याचे नागरिकांना निर्देश
- मास्क घालून जेवणारा पहिला माणूस, सोशल मीडियावर राहूल गांधी यांची उडविली जातेय खिल्ली
- ओमायक्रॉन मानवी त्वचेवर 21 तासांपर्यंत जगू शकतो