विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जर तुम्ही बँकेत नोकरीसाठी इच्छुक असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने (Bank of Maharashtra, BOB) ने जनरलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज मागवले आहेत. याअंतर्गत एकूण ५०० पदांची भरती केली जाणार आहे. Recruitment of 500 posts starts in Maharashtra BankApplication process from today till 22nd February
स्केल २ आणि स्केल ३ साठी ही भरती केली जात आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच ५ फेब्रुवारी पासून सुरू होत असून ती २२ फेब्रुवारी पर्यंत चालेल. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे, ते त्यासाठी अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जनरलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज करणारे सर्व उमेदवार ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असावेत. तसेच, SC/ST/OBC/PWBD उमेदवारांसाठी ५५% गुण असावेत.
तसेच, जनरलिस्ट ऑफिसर सेकंड स्केलच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. तर सामान्य अधिकारी तृतीय श्रेणीच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ३८ वर्षे असावे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल.
सामान्य अधिकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी, महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट द्यावी. त्यानंतर ‘करिअर’ विभागात जाऊन’ऑनलाइन अर्ज करता येईल.
अशा प्रकारे निवड होईल
बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे जनरलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. याशिवाय, भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
Recruitment of 500 posts starts in Maharashtra BankApplication process from today till 22nd February
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान आज करणार समाज सुधारक रामानुजाचार्य पुतळ्याचे अनावरण
- मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू बकरला अटक
- पोलीसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या व्हायच्या गुप्त बैठका, देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांचाच धक्कादायक खुलासा
- आता आणखी एक केजीएफ, राजस्थानच्या कोटडी भागात सापडली सोन्याची खाण