• Download App
    "कविता कमी आणि इतिहास जास्त वाचा"; ज्योतिरादित्य शिंदे यांचा जयराम रमेश यांना टोला!Read less poetry and more history Jyotiraditya Shindes advice to Jairam Ramesh

    “कविता कमी आणि इतिहास जास्त वाचा”; ज्योतिरादित्य शिंदे यांचा जयराम रमेश यांना टोला!

    राहुल गांधींवर टीका केल्याने जयराम रमेश यांनी साधला होता निशाणा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर भाजपा आणि काँग्रेस आमनेसामने आहेत. दोन्ही पक्षाचे नेते विविध मुद्द्यांवर एकमेकांना घेरताना दिसत आहेत. याचप्रकारे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेस नेते जयराम रमेश आमनेसामने आले आहेत. जयराम रमेश यांनी गद्दार म्हटल्याबद्दल ज्योतिरादित्य शिंदे यांनी जोरदार प्रहार केला. Read less poetry and more history Jyotiraditya Shindes advice to Jairam Ramesh

    ज्योतिरादित्य शिंदे यांनी जवाहरलाल नेहरूंच्या ‘ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ या पुस्तकातील एक उतारा ट्विट केला आणि म्हटले की “कविता कमी आणि इतिहास जास्त वाचा.” पुस्तकाचा जो भाग त्यांनी ट्विट केला आहे, त्यात लिहिले आहे की ‘’अशा प्रकारे त्यांनी (मराठ्यांनी) दिल्ली साम्राज्य जिंकले. मराठे ब्रिटिश वर्चस्वाला आव्हान देत राहिले. पण ग्वाल्हेरच्या महादजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर मराठा सत्तेचे विघटन झाले.’’

    दुसर्‍या ट्विटमध्ये, त्यांनी पुस्तकातील आणखी एक उतारा शेअर केला आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “1782 मध्ये मराठ्यांनी दक्षिणेत इंग्रजांचा पराभव केला. उत्तरेत, ग्वाल्हेरच्या शिंदेंचे वर्चस्व होते व त्यांनी दिल्लीच्या असहाय सम्राटावर वर्चस्व आणि नियंत्रणात ठेवले.”

    केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. देशाच्या विरोधात काम करणाऱ्या ‘गद्दारां’शिवाय पक्षाकडे कोणतीही विचारधारा उरली नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. याला विरोध करत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विट करून म्हटले की, “सुभद्रा कुमारी चौहान यांची झाशीच्या राणीवरील अजरामर कविता ते विसरले आहेत का? ‘’अंग्रेजों के मित्र सिंधिया ने छोड़ी राजधानी थी, बुंदेले हरबोलों के मुँह ने सुनी थी कहानी, खूब लड़ी मरदानी वह तो झाँसी वाली रानी थी.” जयराम रमेश यांच्या या ट्वीटरव ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रत्युत्तर देत त्यांना इतिहास वाचण्याचा सल्ला दिला आहे.

    Read less poetry and more history Jyotiraditya Shindes advice to Jairam Ramesh

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!