वृत्तसंस्था
नवी दिल्ली : क्रेडिट, डेबिट कार्डसाठी आरबीआयची नवीन मार्गदर्शक तत्त्वे जुलैपासून लागू होणार आहेत. १ जुलैपासून आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मोफत जारी केलेल्या क्रेडिट कार्डांवर कोणतेही छुपे शुल्क आकारले जाणार नाही. बँका ग्राहकांना डेबिट कार्ड घेण्याची सक्ती करणार नाहीत. RBI’s new guidelines for credit, debit cards; Effective from 1st July
क्रेडिट कार्ड फीमध्ये बदल होण्याच्या ३० दिवस आधी वापरकर्त्याला सूचित केले जाईल. क्रेडिट कार्ड अर्ज नाकारण्याचे कारण वापरकर्त्याला लिखित स्वरूपात दिले जाईल.