• Download App
    रिझर्व्ह बॅंकेच्या पवित्र्यामुळे बॅंका येणार ताळ्यावर, यापुढे एटीएममध्ये पैसे नसल्यास बँकांना होणार दंड|RBI will now fined Banks If they not put cash in ATM

    रिझर्व्ह बॅंकेच्या पवित्र्यामुळे बॅंका येणार ताळ्यावर, यापुढे एटीएममध्ये पैसे नसल्यास बँकांना होणार दंड

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – अनेक बँकांच्या एटीएममध्ये बऱ्याचदा रोख नसल्याने ग्राहकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे इतर बँकांच्या एटीएमवर विसंबून रहावे लागते. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यावर आता बॅंकाना थेट दंड ठोठावणार असल्याचे जाहीर केले आहे.RBI will now fined Banks If they not put cash in ATM

    समजा एटीएममध्ये एका महिन्यात १० तासांहून अधिक काळ रोख रक्कम शिल्लक नसल्यास यापुढे बँकांकडून रिझर्व्ह बँक दंड आकारेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परिपत्रकाद्वारे हा आदेश काढला आहे. या नियमाची अंमलबजावणी एक ऑक्टोबरपासून होईल. या निर्णयानुसार रक्कम नसलेल्या प्रत्येक एटीएमसाठी दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.



     

    या आदेशामुळे यापुढे बँकांना आपल्या एटीएममध्ये कायम रोख ठेवणे आवश्यक झाले आहे. ज्या बँकांच्या एटीएममध्ये आरबीआयने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त काळ रोख नसेल तर त्या बँकांना आरबीआय दंड ठोठावेल.

    RBI will now fined Banks If they not put cash in ATM

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत यांनी सुनावणीतून स्वतःला वेगळे केले; म्हणाले- हितसंबंधांच्या संघर्षाचा आरोप होऊ शकतो

    India-China : 6 वर्षांनंतर लिपुलेख खिंडीतून सुरू होईल भारत-चीन व्यापार; 2019 मध्ये गलवान संघर्षानंतर बंद झाला होता

    Premium Petrol : प्रीमियम पेट्रोल ₹2.35 प्रति लिटरपर्यंत महागले; इराण युद्धाचा परिणाम, सामान्य पेट्रोल जुन्या दरानेच मिळणार