• Download App
    देशातील १४ बॅँकांना रिझव्हॅ बॅँकेने केला दंड, कर्जाचा डाटा ठेवण्याच्या नियमांचा केला भंग|RBI fines 14 banks for breach of credit data rules

    देशातील १४ बँकांना रिझर्व्ह बँकेने केला दंड, कर्जाचा डाटा ठेवण्याच्या नियमांचा केला भंग

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बिगर बँकिंग वित्त संस्थांना कर्ज देणे आणि मोठ्या कर्जांचा डाटा ठेवणे यासंबंधी घालून देण्यात आलेल्या नियमांचा भंग केल्यामुळे १४ बँकांना रिझर्व्ह बँकेने जबर दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.RBI fines 14 banks for breach of credit data rules

    एका उद्योग समूहाला देण्यात आलेल्या कर्जाच्या खात्याची छाननी केल्यानंतर काही त्रुटी आढळून आल्या होत्या. यावरून ही कारवाई करण्यात आली. या उद्योग समूहाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. तथापि, दंड ठोठावण्यात आलेल्या बँकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.


    RBI Monetary Policy : रिझर्व्ह बँकेने वाढलेल्या महागाईमुळे रेपो रेट 4% वर कायम ठेवला, ग्रोथ रेटचा अंदाज घटवला


     

    यामध्ये बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑ फ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्रेडिट सुसी, इंडियन बँक, इंडसइंड बँक, कर्नाटक बँक, करुर वैश्य बँक, पंजाब अँड सिंध बँक, साऊथ इंडिया बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, जम्मू व काश्मीर बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे.

    RBI fines 14 banks for breach of credit data rules

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी