ravishankar vs twitter : यूएस डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्यांतर्गत ट्विटरने काल केंद्रीय आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांचे खाते एक तासासाठी ब्लॉक केले. यानंतर रविशंकर प्रसाद यांनी याला ट्विटरची मनमानी आणि असहिष्णूता असे संबोधले होते. आता याप्रकरणी ट्विटरचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्विटरने म्हटले आहे की, जेव्हा कॉपीराइटबद्दल कायदेशीर तक्रारी प्राप्त होतात, तेव्हा अशी कारवाई केली जाते. ravishankar vs twitter explained reason behind ravi shankar prasad account Locked use of ar rahman song valid copyright complaint
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : यूएस डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्यांतर्गत ट्विटरने काल केंद्रीय आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांचे खाते एक तासासाठी ब्लॉक केले. यानंतर रविशंकर प्रसाद यांनी याला ट्विटरची मनमानी आणि असहिष्णूता असे संबोधले होते. आता याप्रकरणी ट्विटरचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्विटरने म्हटले आहे की, जेव्हा कॉपीराइटबद्दल कायदेशीर तक्रारी प्राप्त होतात, तेव्हा अशी कारवाई केली जाते.
एआर रहमान यांचे प्रसिद्ध गीत ‘माँ तुझे सलाम’वर ट्विटरने सोनी म्युझिक एंटरटेनमेंट कंपनीकडून कॉपीराइट क्लेम मिळाल्याचा दावा केला आहे. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आपल्या स्पष्टीकरणात असे म्हटले आहे की, अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट अॅक्ट (डीएमसीए) च्या नोटीसनंतर हे खाते तात्पुरते ब्लॉक केले गेले होते.
ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले की, ज्या ट्विटमुळे हे प्रकरण समोर आले आहे त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याच वेळी प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही खात्रीशीर सांगतो की डीएमसीएच्या नोटिसीनंतर माननीय आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांचे खाते तात्पुरते ब्लॉक केले होते. ज्या ट्विटमुळे हे घडले, ते काढून टाकण्यात आले आहे. आमच्या पॉलिसीनुसार कोणत्याही सामग्रीच्या कॉपीराइट मालकाकडून किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीच्या अनुषंगाने वैध तक्रार प्राप्त झाल्यावर कारवाई केली जाते.
ए.आर. रहमान यांच्या गाण्याचा कॉपीराइट
ट्विटरने ‘डीएमसीए नोटीस टू ट्विटर’ या शीर्षकाने एक निवेदन दिले आहे. यात ट्विटरने म्हटले आहे की, या ट्विटवर सोनी म्युझिक एंटरटेनमेंट कंपनीने कॉपीराइट क्लेम आहे. त्यांनी सांगितले की, ट्विटमध्ये दिलेल्या क्लिपमध्ये संगीतकार ए.आर. रहमान यांचे प्रसिद्ध गाणे ‘माँ तुझे सलाम’ वापरण्यात आले आहे. ज्यानंतर या ट्विटवर म्युझिक कंपनीने कॉपीराइटचा दावा केला होता. यानंतर आपल्या कॉपीराइट धोरणाखाली ट्विटरने आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या खात्यावर तात्पुरती एका तासासाठी बंदी घातली होती.
ravishankar vs twitter explained reason behind ravi shankar prasad account Locked use of ar rahman song valid copyright complaint
महत्त्वाच्या बातम्या
- जेपी नड्डांनी ट्वीटरवर शेअर केले कार्यकर्त्याचे भावनिक पत्र, ‘मन की बात’विषयी व्यक्त केल्या भावना
- Corona Vaccine : भारतात जुलैपासून मिळू शकते सिंगल डोस Johnson & Johnson ची लस, एवढी असेल किंमत
- कर्जबुडव्या विजय मल्ल्याची संपत्ती ईडीने विकली, SBI कन्सॉर्टियमला मिळाले 5,800 कोटी रुपये
- भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले – संघर्ष कधी अन् संवाद कधी हे ज्याला कळतं तोच खरा नेता!
- Anil Deshmukh : पालांडे डील करायचे, शिंदे पैसे घ्यायचे, देशमुखांच्या स्वीय सहायकांवर आरोप, ईडी पुन्हा बजावणार समन्स