पूर्व लडाखमधील सीमावादानंतर चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : SCO संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षण मंत्री जनरल ली शांगफू यांची भेट घेतली. राजनाथ सिंह म्हणाले की, ‘’भारत-चीन संबंधांचा विकास हा सीमेवर शांतता पसरवण्यावरच आधारित आहे. LAC वरील सर्व समस्या विद्यमान द्विपक्षीय करार आणि वचनबद्धतेनुसार सोडवणे आवश्यक आहे.’’ Rajnath Singh met Chinas Defense Minister in the SCO meeting
या बैठकीनंतर संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘दोन्ही मंत्र्यांनी भारत-चीन सीमावर्ती भाग तसेच द्विपक्षीय संबंधांच्या विकासाबाबत स्पष्ट चर्चा केली. ते म्हणाले की LAC वरील सर्व समस्या विद्यमान द्विपक्षीय करार आणि वचनबद्धतेनुसार सोडवणे आवश्यक आहे. विद्यमान करारांच्या उल्लंघनामुळे द्विपक्षीय संबंधांचा संपूर्ण पायाच नष्ट झाला आहे. असा पुनरुच्चार राजनाथ सिंह यांनी केला.
गलवान संघर्षानंतरचा पहिला भारत दौरा –
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी शांगफू दिल्लीला पोहोचल्यानंतर ही चर्चा झाली. SCO च्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन भारत करत आहे. तीन वर्षांपूर्वी पूर्व लडाखमधील सीमावादानंतर चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. गोव्यात होणाऱ्या SCO सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे परराष्ट्र मंत्री चिन कांग हेही पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. 4 आणि 5 मे रोजी ही बैठक होणार आहे.
Rajnath Singh met Chinas Defense Minister in the SCO meeting
- मोदी सरकारचा मोठा निर्णय! देशभरात १५० पेक्षा अधिक नर्सिंग कॉलेज सुरू होणार
- उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे कपडे फाडू; नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा
- NCERT ने हटवलेला अभ्यासक्रम केरळात शिकवणार, गुजरात दंगलीचे प्रकरण पुन्हा समाविष्ट करणार
- आयुर्वेदिक डॉक्टरांना एमबीबीएस प्रमाणे समान वेतनाचा हक्क नाही, सुप्रीम कोर्टाने रद्द केला गुजरात हायकोर्टाचा निर्णय