• Download App
    Raid on the house of AIADMK leader

    अण्णाद्रमुकच्या आणखी एका माजी मंत्र्यावर छापे, तमिळनाडूतील राजकारण वेगळ्या वळणावर

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई – तमिळनाडूत बेसुमार संपत्तीप्रकरणी माजी मंत्री व विरोधी पक्ष अण्णा द्रमुकचे नेते के. सी. वीरमणी यांच्या मुळ गावासह २० पेक्षा जास्त ठिकाणी दक्षता व भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाने छापे घातले. यामुळे सत्तारुढ द्रमुक व विरोधी पक्ष अण्णा द्रमुकमधील संघर्ष शिगेला पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.Raid on the house of AIADMK leader

    छाप्यांच्या कारवाईला सामोरे जावे लागलेले ते तिसरे माजी मंत्री ठरले. याआधी वाहतूक मंत्री एम. आर. विजयभास्कर आणि महापालिका प्रशासन मंत्री एस. पी. वेलूमणी यांच्या बाबतीत हे घडले होते.



    वीरमणी यांच्याकडे वाणिज्य कर हे खाते होते. २०१६ ते २०२१ दरम्यानच्या काळात त्यांनी २८ कोटी रुपयांची संपत्ती जमविली, जी ६०० पट जास्त आहे असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

    अण्णाद्रमुकने हे सूडाचे राजकारण असल्याचे प्रत्यूत्तर दिले आहे. वरिष्ठ नेते ओ. पनीरसेल्वम आणि के. पलानीस्वामी यांनी संयुक्त निवेदन जारी केले. त्यानुसार तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांच्या पोलिसांनी वीरमणी यांच्या निवासस्थानासह २८ ठिकाणी छापे घातले. पुढील महिन्यात जिल्हा पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहेत. त्यात पूर्ण ताकदीनिशी आमच्या कार्यकर्त्यांना उतरता येऊ नये हाच त्यांचा डाव आहे.

    Raid on the house of AIADMK leader

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!