‘’यामुळे केवळ लोकशाहीचे रक्षणच होणार नाही, तर येणाऱ्या काळात…’’ असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे केरळच्या वायनाडमधील खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ बद्दल अपमानास्पद टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच, राहुल गांधींना गुजरातच्या सुरत कोर्टात मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर कायद्यानुसार त्यांचे संसदेचे सदस्यत्व संपुष्टात आले आहे. याप्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे नेते, कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली जात आहे. आता तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही यावर प्रतिक्रिया देत, मोदींवर निशाणा साधला आहे. Rahul Gandhis disqualification will help Opposition get advantage of 100 plus seats TMCs Shatrughan Sinha
खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले की “मी पंतप्रधान मोदींना धन्यवाद म्हणतो, त्यांनी जे केले ते विनाशकाले विपरीत बुद्धीचे उदाहरण आहे. पण यामुळे केवळ लोकशाहीचे रक्षण होणार नाही तर राहुल गांधी आणि विरोधकांना १०० हून अधिक जागा मिळवून देण्यास मदत होईल.”
याचबरोबर, ’’हे पहा खूप चांगली सुरुवात झाली आहे. हजारो किलोमीटरच्या लांबच्या प्रवासाची सुरुवात पहिलं पाऊल टाकल्याने होते. हे खूप जबरदस्त राजकीय पाऊल उचललं आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व आमच्या नेत्या ममता बॅनर्जी, त्याही पुढे आल्या आहेत. या मुद्य्यावर पुढे आल्या आहेत. लोकशाहीच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. आज आमचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांचे आपसात काही असो, परंतु हा मुद्दा एवढा गंभीर आहे की आज तेही यासाठी पुढे आले आहेत. ही तर खूप चांगली सुरुवात आहे, याची आम्ही प्रशंसा करतो. यासाठी मी आमचे मित्र नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. कारण, त्यांनी जे केलं ते विनाशकाले विपरीत बुद्धीचे उदाहरण दिसत आहे. राजकीयदृष्ट्या याचा विरोधी पक्षांना फार मोठा फायदा होणार आहे. राहुल गांधींना फार मोठे शस्त्र हाती दिलं आहे. यामुळे केवळ लोकशाहीचे रक्षणच होणार नाही, तर येणाऱ्या काळात १०० पेक्षा अधिक जागांचा फायदा राहुल गांधी आणि विरोधकांना होणार आहे.’’ असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत.
Rahul Gandhis disqualification will help Opposition get advantage of 100 plus seats TMCs Shatrughan Sinha
महत्वाच्या बातम्या
- ‘नमो’ शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना सन्मान निधी देण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- राहुल गांधींच्या अपात्रतेप्रकरणी नितीश कुमारांच्या मौनावर गिरीराज सिंह यांचा टोला, म्हणाले…
- राहुल गांधी हार्वर्ड – केंब्रिजचे पोस्ट ग्रॅज्युएट, पण त्यांना पप्पू बनविले; प्रियांका गांधींचा दावा; पण निवडणूक प्रतिज्ञापत्रात डिग्रीचा उल्लेखही नाही
- अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची 28 मार्चला INS चिल्का युद्धनौकेवर पासिंग आऊट परेड