Sonia Gandhi : राजस्थानातील जयपूरमध्ये रविवारी काँग्रेस पक्षाने महागाईच्या निमित्ताने केंद्र सरकारला घेराव घातला. मात्र, या ‘महंगाई हटाओ रॅली’चा पक्षाला किती फायदा होईल, हे येणारा काळच सांगेल. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व्यासपीठावर उपस्थित होत्या, मात्र मोठ्या संख्येने जमलेल्या पक्ष समर्थकांना त्यांच्या तोंडून एक शब्दही ऐकू आला नाही. प्रदीर्घ काळ काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या सोनियांचे मौन कार्यकर्त्यांना कोणता संदेश देण्यासाठी होते, यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. Rahul Gandhi was talking about the difference between Hindus and pro-Hindus, but Sonia Gandhi left the Stage without giving a speech
प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानातील जयपूरमध्ये रविवारी काँग्रेस पक्षाने महागाईच्या निमित्ताने केंद्र सरकारला घेराव घातला. मात्र, या ‘महंगाई हटाओ रॅली’चा पक्षाला किती फायदा होईल, हे येणारा काळच सांगेल. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व्यासपीठावर उपस्थित होत्या, मात्र मोठ्या संख्येने जमलेल्या पक्ष समर्थकांना त्यांच्या तोंडून एक शब्दही ऐकू आला नाही. प्रदीर्घ काळ काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या सोनियांचे मौन कार्यकर्त्यांना कोणता संदेश देण्यासाठी होते, यावरून आता चर्चा सुरू झाली आहे.
2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवामुळे राहुल गांधींनी राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. संघटना निवडणुकीबाबत पक्षात आवाज उठत असतानाही काँग्रेसने नवीन अध्यक्षाची निवड सप्टेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलली आहे. दरम्यान, पक्षाला देशभरात ठिकठिकाणी बंडखोरीची झळ सोसावी लागत आहे. पक्षाचे काही नेते पक्षाची सूत्रे हाती घेण्यासाठी गांधी घराण्याबाहेरील कोणाची तरी वकिली करतात. मात्र, राहुल गांधी हेच पक्षाचे भविष्य असल्याचे पक्षातील एका वर्गाचे मत आहे.
राहुल गांधी अद्याप अध्यक्ष नसले तरी पक्षाशी संबंधित प्रत्येक मोठा निर्णय तेच घेतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. अलीकडच्या काळात पंजाबमधील घडामोडींवर त्यांनी लक्ष वेधले. ज्या प्रकारे सोनियांचे विश्वासू कॅप्टन अमरिंदर सिंग यांना बाजूला सारून नवज्योतसिंग सिद्धू, राहुल आणि प्रियांका यांच्याकडे प्रदेश काँग्रेसची कमान सोपवली, त्यावरून आता राहुल हेच पक्षाचे हायकमांड असल्याचे स्पष्ट झाले.
जयपूर येथील रॅलीत सोनियांचे मौन हे यामुळेच अधिक ठळक दिसून येते. सोनिया गांधी पक्षाच्या मार्गदर्शकाच्याच भूमिकेत दिसल्या. तर राहुल गांधीही पूर्ण तयारीने उतरल्याचे दिसून आले. त्यांनी गॅस सिलिंडरपासून ते पेट्रोल-डिझेलपर्यंतच्या महागाईवरून केंद्राला घेरताना हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातील फरक सांगण्यासाठी अनेक तर्कवितर्क लढवले. या भाषणादरम्यान सोनियांनी टाळ्या वाजवल्या. परंतु त्यांनी भाषण केले नाही. यामुळेच आता यापुढे फोरफ्रंटवर राहुलच राहणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
Rahul Gandhi was talking about the difference between Hindus and pro-Hindus, but Sonia Gandhi left the Stage without giving a speech
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसच्या महागाई हटाव महारॅलीत गांधी परिवाराचा हिंदुत्ववाद्यांवर हल्लाबोल; दीर्घकाळानंतर सोनिया गांधी सार्वजनिक मंचावर!!
- अमेरिका अस्मानी संकटात : पाच राज्यांत आतापर्यंत 80 हून अधिक मृत्यू, बायडेन म्हणाले – नेमक्या नुकसानीचा अंदाज लावणे अवघड
- उद्या पंतप्रधान मोदी करणार काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन, पंगतीत बसून घेणार भोलेबाबाचा प्रसाद, असा आहे शेड्यूल
- दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जलतरणपटूवर बलात्काराचा आरोप, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण