विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख चौकीदार चोर है असा केल्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने 20 डिसेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना हा तात्पुरता का होईना, दिलासा मिळाला आहे.Rahul Gandhi was given a temporary consolation in the defamation case
राहुल गांधी यांच्याविरोधात महेश हुकूमचंद श्रीश्रीमल यांनी मुंबईतील गिरगाव न्यायालयात मानहानीची तक्रार केली होती. या प्रकरणी राहुल गांधी यांच्या नावे समन्स जारी झाला होता. त्यांना न्यायालयाने प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश दिला होता.
त्यावर ही तक्रार रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे. त्या अर्जावर आज सोमवारी न्या. एस. के. शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली. मानहानीच्या खटल्यात 20 डिसेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने गिरगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाला दिला.
राहुल गांधी यांनी सप्टेंबर 2018 मध्ये राजस्थानात झालेल्या एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख चौकीदार चोर है असा केला होता. त्यावरून त्यांच्यावर खटला दाखल झाला होता.
Rahul Gandhi was given a temporary consolation in the defamation case
महत्त्वाच्या बातम्या
- अॅमेझॉन नाही ही तर गांजा कंपनी, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा आरोप
- रोहित शर्मा कोहलीनंतर टी-२० क्रिकेटमध्ये ठरला मजबूत कर्णधार
- WATCH : पवारसाहेब कुणाकुणाचा हिशेब मागणार सोमय्या इंधन महाग आणि विदेशी दारू स्वस्त का ?
- तालिबानचे महिलांवरील निर्बंध आणखी कडक, टीव्ही चॅनल्सना महिला कलाकारांच्या कार्यक्रमांना बंदी, महिला अँकर्सना हिजाब सक्तीचा
- अनिल परब यांनी घेतली शरद पवारांची भेट ; ‘ या ‘ मुद्द्यांवर झाली चर्चा