• Download App
    राहुल गांधींनी एका दिवसात ट्विटरवरून अनेक नेत्यांना - पत्रकारांना केले अनफॉलो । Rahul Gandhi Twitter Account unfollow many leaders

    राहुल गांधींनी एका दिवसात ट्विटरवरून अनेक नेत्यांना – पत्रकारांना केले अनफॉलो

    Rahul Gandhi : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी हे मागील काळापासून ट्विटरवर चर्चेचा विषय राहिले आहेत. याचे कारण राहुल गांधींनी ट्विटरवर मंगळवारी आपल्या पक्षाचे नेते, काही निकटवर्तीय आणि अनेक पत्रकारांसह अनेकांना अनफॉलो केले आहे. एवढेच नव्हे तर वायनाडच्या खासदार कार्यालयात काम करणारे काही लोक आणि दिल्लीत कार्यरत ज्येष्ठ पत्रकारांची नावेही यात समाविष्ट आहेत. Rahul Gandhi Twitter Account unfollow many leaders


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी हे मागील काळापासून ट्विटरवर चर्चेचा विषय राहिले आहेत. याचे कारण राहुल गांधींनी ट्विटरवर मंगळवारी आपल्या पक्षाचे नेते, काही निकटवर्तीय आणि अनेक पत्रकारांसह अनेकांना अनफॉलो केले आहे. एवढेच नव्हे तर वायनाडच्या खासदार कार्यालयात काम करणारे काही लोक आणि दिल्लीत कार्यरत ज्येष्ठ पत्रकारांची नावेही यात समाविष्ट आहेत.

    राहुल गांधींच्या या कृतीची सोशल मीडियावर चर्चा होत असून राजकीय चर्चाही जोरात सुरू आहेत. आता जेव्हा वातावरण तापले, तेव्हा कॉंग्रेस पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले की, ही एक प्रथा आहे ज्यामध्ये राहुल गांधी यांचे खाते रिफ्रेश केले जात आहे. लवकरच काही लोकांची यादी तयार होईल, राहुल गांधी त्यांना ट्विटरवर फॉलो करतील, यात ज्यांना नुकतेच अनफॉलो केले आहे अशांचाही समावेश असू शकेल.

    मंगळवारी राहुल गांधींनी अचानक अनेकांना अनफॉलो करायला सुरुवात केली, तेव्हा चर्चा सुरू झाली आणि प्रत्येकजण त्यातून भिन्न निष्कर्ष काढू लागला. मात्र, राहुल गांधींची टीम तयार करणाऱ्या नव्या यादीमध्ये नेते-पत्रकार आणि इतर क्षेत्रातील लोकांचा समावेश असेल, असे पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसकडून जरी काही स्पष्टीकरण दिले जात असले तरी राहुल गांधी यांच्या या निर्णयाने चर्चेचे वातावरण तापले आहे. राहुल गांधींच्या भविष्यातील रणनीती तयार करण्याच्या दृष्टीनेही हे पाहिले जात आहे. राहुल गांधी काही काळासाठी ट्विटरवर आक्रमक होते, कोरोना काळात त्यांनी ट्विटरच्या माध्यमातूनच सरकारवर निशाणा साधला आहे. तर विरोधकांनी ते केवळ ट्विटरवर सक्रिय असल्यावरून लक्ष्य करत आहेत.

    Rahul Gandhi Twitter Account unfollow many leaders

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य