Monday, 5 May 2025
  • Download App
    राहूल गांधींनी कटरा ते वैैष्णोदेवी १४ किलोमीटर केला पायी प्रवास, राजकीय वक्तव्य करण्यास दिला नकार|Rahul Gandhi traveled 14 km from Katra to Vaishnodevi on foot, refusing to make political statements

    राहूल गांधींनी कटरा ते वैैष्णोदेवी १४ किलोमीटर केला पायी प्रवास, राजकीय वक्तव्य करण्यास दिला नकार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: जम्मू च्या दौऱ्यावर असलेले कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी कटरा ते वैैष्णोदेवी हा १४ किलोमीटरचा प्रवास पायी केला. या वेळी त्यांनी कोणतीही राजकीय टिप्पणी करण्यास नकार दिला. मातेच्या दर्शनासाठी आलो आहे. त्यामुळे मला राजकीय वक्तव्य करायचे नाही असे ते म्हणाले.Rahul Gandhi traveled 14 km from Katra to Vaishnodevi on foot, refusing to make political statements

    राहूल गांधी यांचा एक व्हिडीओ प्रसिध्द झाला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत कॉँग्रेसचे नेते चालताना दिसत आहेत. त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कडे केले असून मार्गावर कॉँग्रेसचे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे हातात धरून उभे आहे.



    यावेळी अनेक पत्रकारांनी राहूल गांधी यांना प्रश्न विचारले. मात्र, पत्रकारांना कॅमेरे घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. राहूल गांधी म्हणाले, मी येथे मातादेवीची प्रार्थना करण्यासाठी आलो आहे. मला येथे कोणतीही राजकीय टिप्पणी करायची नाही.

    काँग्रेसचे जम्मू -काश्मीर प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर यांनी सांगितले की, राहूल गांधी यांना अनेक वर्षांपासून वैष्णोदेवीचे दर्शन घ्यायचे होते. मी गेल्या तीन वर्षांपासून राहुल गांधींना विचारत होतो. त्यांनाही यायचे होते, पण राजकीय परिस्थिती अशी होती की ते भेट देऊ शकत नाहीत.

    राहूल गांधी यांनी पायी चालत मंदिरात जाण्याचा निर्धार केला होता. मंदिरात प्रार्थना आणि आरतीमध्ये सहभागी झाले. ते पायीच उतरणार आहे. त्यांची माता वैष्णो देवीवर विशेष श्रद्धा आहे, म्हणूनच त्यांच्या भेटीच्या पहिल्या दिवशी आम्ही त्यांच्यासाठी कोणतेही राजकीय कार्यक्रम ठरवले नाहीत, असे मीर यांनी सांगितले.

    Rahul Gandhi traveled 14 km from Katra to Vaishnodevi on foot, refusing to make political statement

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Cyber attacks : PDF फाइल्स पाठवून पाकिस्तानी हॅकर्सचे सायबर हल्ले; भारतीय युजर्सचे संगणक, लॅपटॉप आणि फोन टार्गेटवर

    IMF board : भारताने IMF बोर्डातून कार्यकारी संचालकांना काढून टाकले; 6 महिने कार्यकाळ शिल्लक होता

    Waqf Act : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड वक्फ कायद्याच्या विरोधात; हैदराबादेत ‘वक्फ बचाओ, संविधान बचाओ’ मोहीम