विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : “गंगेने बोलावल्याचा दावा करणाऱ्यानेच गंगामातेला रडवले”, अशा शब्दांत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.Rahul Gandhi targets Modiji
गंगा नदीच्या ११४० किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर गेल्या काही दिवसात दोन हजारहून अधिक मृतदेह दफन करण्यात आल्याच्या वृत्ताचा संदर्भ देत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर शरसंधान केले. “गंगेने बोलावले असे जो म्हणत होता त्यानेच गंगामातेला रडवले आहे”,
असे खोचक ट्विट राहुल गांधींनी केले. गंगेच्या काठावरील गावांमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी लाकडे नसल्यामुळे मृतदेहांचे दफन केले जात असल्याचे तसेच काहींनी तसेच मृतदेह नदीपात्रात सोडून दिल्याचेही आढळून आले आहे.
दुसरीकडे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गुजरातमधील मृतांच्या संख्येवरून सत्ताधारी भाजपवर आकडे दडविल्याचा आरोप केला.
गुजरातमध्ये एक मार्च ते १० मे दरम्यान १.२३ लाख मृत्यू दाखले वाटप झाले असताना राज्य सरकारने केवळ ४२१८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हटले असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.
Rahul Gandhi targets Modiji
महत्त्वाच्या बातम्या
- क्वारंटाइन न राहिल्याने तहसिलदारांने नवरदेवालाच ठोठावला चक्क लाखाचा दंड
- भुवनेश्वरमध्ये रुग्णवाहिकेवर ‘जीपीएस’द्वारे नजर, रुग्णांना मिळते झटपट सुविधा
- दिल्लीत देशातील पहिली ऑक्सिजन कॉन्सट्रेटर बॅंक सुरु, रुग्णांना मिळणार मोठा दिलासा
- गाझावरील हवाई हल्ल्यात लहान मुलांसह दहा पॅलेस्टिनी ठार