Rahul Gandhi : कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सीबीएसई परीक्षांच्या आयोजनावर फेरविचार करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र लिहून सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. Rahul Gandhi said the government should reconsider taking the CBSE exam
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सीबीएसई परीक्षांच्या आयोजनावर फेरविचार करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र लिहून सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.
राहुल गांधींनी रविवारी ट्विट केले की, `कोरोनाच्या विनाशकारी दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई परीक्षेबाबत फेरविचार करायला हवा. सर्व निर्णय घेण्यापूर्वी सर्व हितधारकांचा सल्ला घेतला पाहिजे. भारतीय तरुणांच्या भवितव्याशी खेळण्यास भारत सरकार किती महत्त्व देतंय?’
दुसरीकडे प्रियंका गांधींनी रविवारी शिक्षणमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, परीक्षा केंद्रांवर गर्दीमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे अशक्य आहे. त्यांनी या पत्रात म्हटले आहे की, वाढत्या साथीच्या काळात विद्यार्थ्यांना या परीक्षेत भाग घेण्यास भाग पाडल्यास कोणत्याही परीक्षा केंद्रात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्यास सरकार आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) जबाबदार धरले जाईल.
प्रियंका गांधी म्हणाल्या, “या पद्धतीने साथीच्या आजाराचा तीव्र परिणाम होणाऱ्या विद्यार्थ्यांची किंवा इतरांची कायदेशीर जबाबदारी घ्यायला ते तयार आहेत की नाही, याचा विचार सरकारने आणि सीबीएसईने केला पाहिजे.”
Rahul Gandhi said the government should reconsider taking the CBSE exam
महत्त्वाच्या बातम्या
- अवघ्या काही दिवसांत शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल, गॉल ब्लॅडरवर होणार शस्त्रक्रिया
- महाराष्ट्राने ओलांडला १ कोटी लसीकरणाचा टप्पा : आरोप- प्रत्यारोपांच्या धुळवडीतही केंद्र व राज्यात सहकार्य अबाधित!
- लशीकरणाचा विक्रम: ८५ दिवसांत १० कोटींपेक्षा जास्त लोकांना लस; अमेरिका, ब्रिटन आणि चीनलाही टाकले मागे
- उत्तर प्रदेश भाजपला अखेर उपरती; बलात्कारातील दोषी आमदाराच्या पत्नीची उमेदवारी केली रद्द
- सचिन वाझेंचा आणखी एक कारनामा; टीआरपी घोटाळ्यात ३० लाख रूपये लाच घेतल्याचा आरोप; ईडी करणार चौकशी