Rahul Gandhi : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्ष सोडण्याची इच्छा असलेल्या नेत्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, ज्यांना भीती वाटते त्यांनी पक्ष सोडला पाहिजे. आम्हाला निडर नेत्यांची गरज आहे, भेकड नाही. घाबरणाऱ्यांना पक्षाच्या बाहेर काढा. राहुल गांधी सोशल मीडियाशी संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. Rahul Gandhi Said Congress Worker Should Not Fear Bjp, We Dont Need Those Who Believe In RSS Ideology
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्ष सोडण्याची इच्छा असलेल्या नेत्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, ज्यांना भीती वाटते त्यांनी पक्ष सोडला पाहिजे. आम्हाला निडर नेत्यांची गरज आहे, भेकड नाही. घाबरणाऱ्यांना पक्षाच्या बाहेर काढा. राहुल गांधी सोशल मीडियाशी संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
ज्यांना भीती वाटते त्यांनी निघून जावं
ते म्हणाले की, ज्यांना भीती वाटते आणि जायचे आहे त्यांनी जावं, आम्हाला निडर माणसांची गरज आहे. ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितीन प्रसाद यांच्यासारख्या नेत्यांचा उल्लेख राहुल यांनी केला होता. त्यांनी कॉंग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. व्हर्च्युअल बैठकीत राहुल कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
भाजपला घाबरण्याची गरज नाही!
त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटले की, कार्यकर्त्यांनी भाजपच्या फेक न्यूजना घाबरू नये. जे घाबरले आहेत त्यांना बाहेर हाकलून द्या, आणि असे बरेच निर्भय लोक आहेत जे कॉंग्रेसमध्ये नाहीत, त्यांना आत आणा. आम्हाला आरएसएसच्या विचारधारेवर विश्वास असणार्या लोकांची गरज नाही. दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळापासून कॉंग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. कॉंग्रेस सोडून भाजपामध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांना अलीकडेच पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.
Rahul Gandhi Said Congress Worker Should Not Fear Bjp, We Dont Need Those Who Believe In RSS Ideology
महत्त्वाच्या बातम्या
- पाश्चिमात्य माध्यमांचे भारताबाबत पक्षपाती वार्तांकन, कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान एकतर्फी बातम्या दिल्या, IIMCच्या सर्वेक्षणातून खुलासा
- संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांची माजी संरक्षण मंत्र्यांशी भेट, एलएसीवर चीनच्या स्थितीचे दिले स्पष्टीकरण
- कर्जबुडव्या मल्ल्या, नीरव मोदी आणि चोकसीला ईडीचा दणका, बँकांच्या समूहाने वसूल केले 792.11 कोटी रुपये
- उत्तराखंडनंतर आता कर्नाटकात बदलाचे संकेत! मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या दिल्लीवारीमुळे चर्चांना उधाण
- जेथे बालपणी विकला चहा त्या वडनगर रेल्वे स्थानकचे पीएम मोदींनी केले उद्घाटन, गुजरातला अनेक प्रकल्पांची भेट, जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी