• Download App
    राहुल गांधींचे परदेशातूनही देशांतर्गत घडामोडींवर बारकाईने लक्ष; देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा आणि अन्यही ट्विटस्!!। Rahul Gandhi pays close attention to domestic affairs from abroad; Happy New Year to the countrymen and other tweets !!

    राहुल गांधींचे परदेशातूनही देशांतर्गत घडामोडींवर बारकाईने लक्ष; देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा आणि अन्यही ट्विटस्!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी सध्या खासगी परदेश दौऱ्यावर आहेत. परंतु, परदेशातूनही त्यांचे देशांतर्गत घडामोडींवर बारकाईने लक्ष आहे. त्यांनी देशवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत यंदा युवकांना रोजगार मिळेल. महागाई कमी होईल. शेतकरी आनंदी राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. Rahul Gandhi pays close attention to domestic affairs from abroad; Happy New Year to the countrymen and other tweets !!

    त्याच बरोबर वर्षाअखेरीस माता वैष्णो देवी मंदिरातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला. याविषयी शोकसंदेश देखील त्यांनी ट्विट केला आहे. माता वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरीत जे भाविक मरण पावले त्यांच्या नातेवाईकांशी मी सहसंवेदना व्यक्त करतो, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

    त्यापूर्वी राहुल गांधींनी चीनने अरुणाचल प्रदेशातील 15 नावे बदलून चिनी भाषेत ठेवली याविषयीचे ट्विट केले आहे. नुकताच आपण 1971 च्या युद्धातील भारताच्या विजयाचे 50 वे वर्ष साजरे केले. परंतु आपण अधिक कणखर राहिले पाहिजे, हा संदेश “या बातमीतून” आपण घेतला पाहिजे, असे म्हणत राहुल गांधी यांनी अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे चीनने बदलल्याची बातमी ट्विट केली आहे.

    राहुल गांधी हे नेहमीप्रमाणे नववर्षाच्या सुरुवातीला परदेशात असले तरी त्यांचे देशांतर्गत घडामोडींवर बारकाईने लक्ष आहे. त्यातूनच त्यांनी वरील ट्विट केल्याचे दिसून येत आहे.

    Rahul Gandhi pays close attention to domestic affairs from abroad; Happy New Year to the countrymen and other tweets !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Indian Army पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरच भारताने सध्या थांबविले फायरिंग; भारतीय सैन्य दलांचा स्पष्ट खुलासा; शस्त्रसंधी शब्द नाही वापरला!!

    Operation sindoor : भारत – पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, पण फक्त फायरिंग थांबवल्याचा भारताचा खुलासा!!

    Indo Pak ceasefire : भारताने धोरणात्मक निर्णय बदलल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात यांच्यात शस्त्रसंधी, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा