राहूल गांधी यांनी गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनवर सातत्यने टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर प्रश्नही केले होते. मात्र, आता राहूल गांधींना उपरती झाली असून कोरोनावर उपाययोजनेसाठी लॉकडाऊन अपरिहार्य असल्याचे म्हटले आहे.Rahul Gandhi now saying lockdown is inevitable to stop Corona
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनवर सातत्यने टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर प्रश्नही केले होते. मात्र, आता राहूल गांधींना उपरती झाली असून कोरोनावर उपाययोजनेसाठी लॉकडाऊन अपरिहार्य असल्याचे म्हटले आहे.
कोरोना प्रादुभार्वाच्या संदर्भात राहूल गांधी यांनी पत्र लिहिले आहे. आपल्या पत्रात राहुल म्हणाले की, सरकारच्या अपयशामुळे देशावर पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवरील लॉकडाऊन करण्याची वेळ येऊन ठेवली आहे.
अशा परिस्थितीत गरिबांना त्वरित आर्थिक मदत द्यावी.जेणेकरुन गरिब लोकांना गेल्यावर्षी प्रमाणे त्रासातून जाण्याची गरज नाही. मला पुन्हा एकदा तुम्हाला पत्र लिहिण्यास भाग पाडले गेले आहे, कारण आपला देश कोविड त्सुनामीच्या दिशेने आहे.
अशा प्रकारच्या अनपेक्षित संकटात भारतीय जनतेबाबत आपले सर्वात मोठे प्राधान्य असले पाहिजे. या देशातील लोकांना या त्रासातून वाचवण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याची मी तुम्हाला विनंती करतो.
ते म्हणाले, ‘जगातील प्रत्येक सहा व्यक्तींपैकी एक व्यक्ती भारतीय आहे. आता या रोगापासून हे ज्ञात आहे की, आपला आकार, अनुवांशिक विविधता आणि गुंतागुंतीमुळे भारतात कोरोना विषाणूचे स्वरुप बदलण्यासाठी आणि अधिक धोकादायक होण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे.
मला भीती वाटते की आता ‘कोरोनाची दुसरी लाट’ किती भयानक आहे, हे आपण पाहत आहोत. ‘तिसरी लाट’ कदाचित एक मोठे संकट असू शकते. मात्र, अनियंत्रित पद्धतीने या विषाणूचा प्रसार केवळ आपल्या देशातील लोकांसाठीच नाही, तर उर्वरित जगासाठी देखील जीवघेणा ठरणार आहे.
या विषाणूचा आणि त्यासंबंधी विविध प्रकारांचा वैज्ञानिक पद्धतीने शोध घेणे. सर्व नवीन म्यूटेशन विरोधात लसींचे प्रभावाचे मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे. सर्व लोकांचे त्वरीत लसीकरण केले पाहिजे.
कोविड विरुद्ध लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडे कोणतेही स्पष्ट धोरण नाही आणि व्हायरस पसरत असताना सरकारने साथीच्या रोगावर विजय मिळविल्याचे घोषित केले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की भारत सरकारच्या अपयशामुळे आज राष्ट्रीय स्तरावर लॉकडाऊन अपरिहार्य दिसत आहे.
Rahul Gandhi now saying lockdown is inevitable to stop Corona
महत्वाच्या बातम्या
- भारताला आम्ही आणखी मदत पाठविण्यासाठी तयार, अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरीस यांचे आश्वासन
- कारवाई तरी किती जणांवर करणार, मानहानीकारक पराभावनंतरही अधीर रंजन चौधरींचा राजीनामा नाहीच
- टिचभर केरळपेक्षा कमी सक्रीय रुग्ण, पॉझिटीव्हीटी रेटही निम्मा तरी उत्तर प्रदेशची कोरोना रुग्णांच्या संख्येवरून बदनामी
- वापरकर्त्यांच्या संतापानंतर माघार, प्रायव्हसी पॉलीसी स्वीकारली नसली तरी चालूच राहणार व्हॉटसअॅप
- ९० फूट खोल बोअरवेलमध्ये १६ तास अडकलेल्या अनिलची सुटका, पाईपमधून अन्नपाणी पुरविले
- गोव्यात कर्फ्यू जाहीर, सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद करण्याचे आदेश, पर्यटकांना नो कोव्हिड प्रमाणपत्र सक्तीचे