• Download App
    दिल्लीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना राहुल गांधी भेटले। Rahul Gandhi met the family of a girl victim of a rape and murder case in Delhi

    दिल्लीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना राहुल गांधी भेटले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्लीत नऊ वर्षांच्या दलित मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्या या प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संसदेत आणि संसदेबाहेर घेरण्याची विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे. Rahul Gandhi met the family of a girl victim of a rape and murder case in Delhi

    तृणमूळ काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी अमित शहा यांनी संसदेत येऊन दिल्ली बलात्कार आणि हत्या प्रकरणात निवेदन दिले तर मी मुंडण करेन, असे विचित्र आव्हान दिले आहे. तर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी जुन्या नांगल नगरमध्ये जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली.



    नऊ वर्षाच्या दलित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करून तिच्यावर तिच्या आई-वडिलांच्या संमतीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले जुन्या नांगल नगरमध्ये घटना घडली. या पीडित मुलीच्या कुटुंबीयांची राहुल गांधींनी तिथे जाऊन भेट घेतली.

    राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अमित शहा यांना गृहमंत्री पद पेलत नाही. हाथरसपासून दिल्लीपर्यंत बलात्कारांच्या घटनांची साखळी मोठी आहे. देशात महिला – मुली सुरक्षित नाहीत आणि गृहमंत्री नुसती प्रमाणपत्रे वाटत फिरत आहेत, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. संसदेत अमित शहा यांच्यावर दिल्लीतील दलित मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी जोरदार भडीमार होणार आहे.

    Rahul Gandhi met the family of a girl victim of a rape and murder case in Delhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार