भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र, कॉँग्रेस सॉफ्ट हिंदूत्वाचा अजेंडा राबवून देश बरबाद करत आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यापासून ते राहूल गांधीही हेच करत असल्याचा आरोप केरळच्या माजी आरोग्य मंत्री के.के. शैलजा उर्फ शैलजा टिचर यांनी केला आहे. हिंदू मंदिरांना भेटी देण्यावरून राहूल गांधी यांच्यावर प्रथमच टीका झाली आहे.Rahul Gandhi is ruining the country by implementing the agenda of soft Hindutva, politicians visit temples in secular country, former Kerala Health Minister Shailja Teacher alleges
विशेष प्रतिनिधी
तिरूअनंतपूरम : भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र, कॉँग्रेस सॉफ्ट हिंदूत्वाचा अजेंडा राबवून देश बरबाद करत आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यापासून ते राहूल गांधीही हेच करत असल्याचा आरोप केरळच्या माजी आरोग्य मंत्री के.के.शैलजा उर्फ शैलजा टिचर यांनी केला आहे. हिंदू मंदिरांना भेटी देण्यावरून राहूल गांधी यांच्यावर प्रथमच टीका झाली आहे.
राहूल गांधी निवडणूक प्रचारादरम्यान विविध मंदिरांना भेटी देत असतात. आपण जनेऊधारी ब्राम्हण असल्याचेही ते म्हणतात. याच पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या शैलजा टिचर म्हणाल्या राहूल गांधी शिव मंदिरापासून ते अनेक मंदिरांना भेटी देत आहेत.
निवडणुका जिंकण्यासाठीचे हे एक गिमिक आहे. मात्र, त्यांनी असे करणे चुकीचे आहे. याचे कारण म्हणजे भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. केरळ कॉँग्रेसने तरी किमान या प्रकारे धर्माचा वापर करू नये. केरळची धर्मनिरपेक्ष प्रतिमा कायम ठेवायला हवी.
राजकारण्यांनी मंदिरांना भेटी देण्यासारख्या गिमिक्सचा वापर करू नये आणि धर्मनिरपेक्ष देशात मंदिर भेटी देणे गैर असल्याचा आरोप प्रथमच केला जात आहे. यावर कॉँग्रेसचे आमदार के. बाबू यांनी शैलजा यांच्या आरोपावर आक्षेप घेतले आहेत. केरळ विधानसभेत प्रस्तावच मंजूर करून टाका की मंदिराला भेट देणे चुकीचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
राहूल गांधी जरी मंदिरांना भेटी देऊन आपला सॉफ्ट हिंदूत्वाचा अजेंडा मांडत असले तरी केरळमध्ये मात्र त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. गोहत्या बंदीच्या कायद्याविरुध्द केरळमध्ये कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गाय कापली होती. आपल्या केरळ प्रदेश कॉँग्रेसच्या अध्यक्षांचा यासाठी पाठिंबा असल्याचेही म्हटले होते.
कोरोनाविरुध्द लढ्याच्या केरळ मॉडेलच्या शिल्पकार म्हणून शैलजा टिचर यांना ओळखले जाते. त्यांच्या या कार्याची जगभर दखल घेतली गेली. परंतु, त्यांच्या पक्षाकडूनच त्यांना डावलण्यात आले. केरळमधील नव्या मंत्रीमंडळात त्यांना स्थान दिले गेलेले नाही.
Rahul Gandhi is ruining the country by implementing the agenda of soft Hindutva, politicians visit temples in secular country, former Kerala Health Minister Shailja Teacher alleges
महत्त्वाच्या बातम्या
- हे कसले कोरोनाविरुध्द लढण्याचे आदर्श मॉडेल, देशातील सर्वाधिक मृत्यूसह महाराष्ट्राने गाठला एक लाख कोरोना बळींचा टप्पा
- ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कला कन्यारत्न
- भज्जी तू सुध्दा खलिस्थानवादी! क्रिकेटपटू हरभजनसिंगने केला जर्नलसिंग भिद्रानावलेचा गौरव, शहीद म्हणून केला प्रणाम
- पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू, बॉम्ब फेकून केली हत्या