राहुल गांधी आणि महात्मा गांधी यांच्यातील समानताही सांगतल्या आहेत. जाणून घ्या नेमके कोण आहेत हे आमदार?
विशेष प्रतिनिधी
रायपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारतीय संसदेबद्दल केलेलं वादग्रस्त विधान, मोदी आडनाबद्दलची अपमानस्पद टिप्पणी यानंतर गमावलेलं संसद सदस्यत्व आणि त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या मानहानीचा खटल्यानंतरही, काँग्रेसच्या एका आमदाराने राहुल गांधींची तुलना थेट महात्मा गांधींशी केल्याचे समोर आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अपात्रतेच्या निषेधार्थ, काँग्रेस आमदार अमितेश शुक्ला यांनी राहुल गांधी यांना आधुनिक भारताचे महात्मा गांधी म्हटले. अमितेश शुक्ला यांनी दावा केला की महात्मा गांधी आणि राहुल गांधी यांच्यात अनेक साम्य आहेत. Rahul Gandhi Is Mahatma Gandhi Of Modern India Congress MLA Amitesh Shukla
अमितेश शुक्ला म्हणाले की, ‘’राहुल गांधी हे आधुनिक भारताचे महात्मा गांधी आहेत. महात्मा गांधींशी त्यांच्या अनेक समानता आहेत. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली होती तर महात्मा गांधींनी दांडीयात्रा काढली होती.’’ एवढंच नाहीतर शुक्ला यांनी राहुला गांधींना राष्ट्रपुत्र संबोधलं आहे.
‘’संजय राऊतांना काही कामधंदे नाहीत, त्यांचा पक्ष…’’; चंद्रशेखर बावनकुळेंकडून टीकेवर प्रत्युत्तर!
ते म्हणाले की, मी अत्यंत जबाबदारीने हे विधान केले आहे. मी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील आहे. मी माझ्या वडिलांकडून (अविभाजित मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्यामा चरण शुक्ला) तसेच काका (काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विद्या चरण शुक्ला) यांच्याकडून गोष्टी ऐकल्या आहेत. महात्मा गांधींबद्दल मला वाटतं महात्मा गांधी आणि राहुल गांधी यांच्यात अनेक साम्य आहेत.
ते पुढे म्हणाले की, महात्मा गांधी भारताचे पहिले पंतप्रधान होऊ शकले असते पण त्यांनी तसे केले नाही. तसेच राहुल गांधी २००४ आणि २००८ मध्ये पंतप्रधान होऊ शकले असते पण त्यांनी तसे केले नाही. महात्मा गांधींनी ‘दांडीयात्रे’त जसा अनेक किलोमीटरचा प्रवास केला, त्याचप्रमाणे पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्षही भारत जोडो यात्रेत देशभर पायी फिरले आणि लोकांशी संवाद साधला. तसेच, सत्याच्या शस्त्राने ‘ब्रिटिश साम्राज्य’ संपवणाऱ्या महात्मा गांधींप्रमाणे राहुल गांधीही निर्भयपणे सत्य बोलतात. ते (राहुल गांधी) अदानी स्टॉकच्या मुद्द्यावर तसेच आकडेवारीवर सत्य बोलत आहेत. असंही शुक्ला म्हणाले.
भाजपाची प्रतिक्रिया –
अमितेश शुक्ला यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपा खासदार संतोष पांडे म्हणाले की, छत्तीसगड काँग्रेस मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या दिवाळखोर झाली आहे.
Rahul Gandhi Is Mahatma Gandhi Of Modern India Congress MLA Amitesh Shukla
महत्वाच्या बातम्या
- आंतरधर्मीय विवाहावरून नंदुरबारमध्ये मध्यरात्री हिंसक संघर्ष; दगड-विटांचा मारा, पोलिस जखमी
- कर्नाटकच्या मंत्र्याला अल्पसंख्याकांविरोधात द्वेषपूर्ण भाषण करणे महागात, निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई
- PM मोदींनी मी चूक असल्याचे सिद्ध केले, भाजप सरकार पुरस्कार देईल असे वाटलेही नव्हते, पद्मश्री मिळाल्यानंतर शाह रशीद अहमद कादरी भावुक
- सुप्रीम कोर्ट : ईडी – सीबीआय तपासात पुढाऱ्यांना जन सामान्यांचाच न्याय; विरोधकांच्या “ऑक्सिजन” नळीवर पाय!!