• Download App
    राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपद तर सोडलेय, पण निर्णय ते स्वतःच घेतात, दुसऱ्याला घेऊ देत नाहीत!!; पी. जे. कुरियन यांचा हल्लाबोल Rahul Gandhi has resigned from the post of Congress president, but he takes the decision himself

    राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपद तर सोडलेय, पण निर्णय ते स्वतःच घेतात, दुसऱ्याला घेऊ देत नाहीत!!; पी. जे. कुरियन यांचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था

    तिरुअनंतपुरम : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपद तर सोडले आहे. पण महत्त्वाचे निर्णय ते स्वतःच घेत आहेत. दुसऱ्याला ते निर्णय घेऊ देत नाहीत. स्वतः अध्यक्षपदही स्वीकारत नाहीत आणि दुसऱ्याला स्वीकारू देत नाहीत, असा हल्लाबोल काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. जे. कुरियन त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे. Rahul Gandhi has resigned from the post of Congress president, but he takes the decision himself

    त्याच वेळी काँग्रेसचा अध्यक्ष हा नेहरू-गांधी परिवारातलाच हवा असा कोणताही आग्रह असता कामा नये, असे त्यांनी काँग्रेस हायकमांडला सुनावले. मल्याळम दैनिकाला मुलाखतीत पी. जे. कुरियन यांनी आपली परखड मते मांडली.



    पी. जे. कुरियन म्हणाले, की 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधींनी पक्षासाठी उत्तम व्यूहरचना करायला हवी होती. पक्षातल्या सर्व ज्येष्ठ – वरिष्ठ नेत्यांची संवाद साधायला हवा होता. परंतु, त्यांनी त्यांच्या भोवतीच्या नेत्यांवरच फक्त विश्वास ठेवला आणि रणनीती आखली. त्यामुळे काँग्रेसचा दारुण पराभव झाला. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडून देताना देखील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली नाही. स्वतःभोवतीच नेत्यांशी चर्चा करून त्यांनी अचानक काँग्रेसचे अध्यक्षपद सोडून दिले, पण महत्त्वाचे निर्णय आजही पक्षात ते स्वतः घेत आहेत. दुसऱ्या कोणालाही निर्णय घेऊ दिले जात नाहीत. पक्षाचे अध्यक्षपद गेले अडीच वर्ष रिकामे आहे. कोणतीही जबाबदार व्यक्ती पुढे येऊन अध्यक्षपद स्वीकारत नाही. किंवा त्या व्यक्तीला अध्यक्षपद स्वीकारू दिले जात नाही, असे कठोर शरसंधान कुरियन यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसचा हायकमांड वर सोडले आहे.

    जी 23 गटाचे नेते नियमितपणे काँग्रेस हायकमांड वर शरसंधान साधतच असतात. आता त्यांच्यात पी. जे. कुरियन यांची देखील भर पडली आहे.

    वास्तविक पक्षाच्या पराभवानंतर तरी राहुल गांधींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची विचारविनिमय सुरू करायला हवा होता. त्यातून पक्ष संघटनेसाठी काही चांगला मार्ग निघू शकला असता. पण राहुल गांधीनी तसे केले नाही. पक्षाला संभ्रमावस्थेत ठेवूनच त्यांनी पक्षाध्यक्ष सोडले. मजधारेत कॅप्टनने बोट सोडून जायचे नसते, असेही त्यांनी राहुल गांधी यांना सुनावले आहे.

    Rahul Gandhi has resigned from the post of Congress president, but he takes the decision himself

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची