Rahul Gandhi : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. दररोज आढळणारी रुग्णसंख्या आधीचे सर्व रेकॉर्ड मोडत आहे. याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना नुकतेच पत्र लिहिले होते. आता राहुल यांनी पुन्हा केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे परप्रांतीय मजुरांच्या स्थलांतरासंदर्भात केंद्र सरकारवर टीका केली आहे. यासह राहुल यांनी देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेवरही तीव्र शब्दांत टीका केली आहे. Rahul Gandhi criticizes central government Over Corona 2nd wave in country
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. दररोज आढळणारी रुग्णसंख्या आधीचे सर्व रेकॉर्ड मोडत आहे. याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना नुकतेच पत्र लिहिले होते. आता राहुल यांनी पुन्हा केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे परप्रांतीय मजुरांच्या स्थलांतरासंदर्भात केंद्र सरकारवर टीका केली आहे. यासह राहुल यांनी देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेवरही तीव्र शब्दांत टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात कोरोनाची भयंकर दुसरी लाट निर्माण झाली आहे. प्रवासी मजुरांना पुन्हा पलायनास भाग पाडले आहे. वाढत्या लसीकरणाबरोबरच सर्वसामान्यांच्या जीवनासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही त्यांच्या हातात पैसे देणे आवश्यक आहे, परंतु अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांपासून अॅलर्जी आहे!’
राहुल यांचे पंतप्रधानांना पत्र
तत्पूर्वी, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना विषाणूची लस खरेदी आणि वितरणात राज्यांची भूमिका वाढवण्याबरोबरच सर्व गरजू लोकांना लसी देण्याची व लस निर्यातीबाबतही सूचना केल्या होत्या. केंद्राने लसीची निर्यात ताबडतोब थांबवली पाहिजे असे ते म्हणाले. केंद्र सरकारकडून योग्य अंमलबजावणी न केल्यामुळे आणि ‘निष्काळजीपणा’ यामुळे लसीकरणाचे प्रयत्न कमी होताना दिसत आहेत, असा आरोपही त्यांनी 9 एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रात केला आहे.
राहुल गांधींचा सेल्फ गोल!
तथापि, राहुली गांधी यांच्या पक्षाची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघडी सरकारनेही प्रवासी मजुरांसाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. यामुळे केंद्रावर टीका करण्याच्या नादात राहुल गांधी यांनी सेल्फ गोल केल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रवासी मजुरांचा सर्वात गंभीर प्रश्न महाराष्ट्रात आहे. मुंबई, पुणे रेल्वे स्थानकांवर प्रवासी मजुरांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. तथापि, लॉकडाऊन लावले तरी आधी ज्यांचे हातावर पोट आहे अशांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजप करत आलं आहे. राज्यातील लॉकडाऊनच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलवली असून यानंतर याबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
Rahul Gandhi criticizes central government Over Corona 2nd wave in country
महत्त्वाच्या बातम्या
- आनंदाची बातमी : हरियाणाच्या दोन पहिलवान मुलींना मिळाले टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट, साक्षी मलिकची निराशा
- CBSE वर प्रियांका गांधींचा संताप, म्हणाल्या – कोरोना काळात मुलांना परीक्षेच्या सक्तीसाठी हे बोर्ड जबाबदार!
- उत्तराखंडचा मोठा निर्णय, बद्रीनाथसह 51 मंदिरे सरकारी ताब्यातून मुक्त; विहिंपने म्हटले – इतर राज्यांनीही असे करावे अन्यथा आंदोलन
- PM मोदी म्हणाले, ‘कूचबिहारची घटना दु:खद, दीदी – तृणमूलची मनमानी चालणार नाही, दोषींना शिक्षा व्हावी’
- WATCH : Leaked Audio Chat Of Prashant Kishor : प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी… ममता हारेल, भाजप जिंकेल!